भरधाव ट्रकने 
दुचाकीस्वाराला चिरडले

भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले

Published on

पिंपरी, ता. ३० : भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना काळेवाडी फाटा येथे शुक्रवारी (ता. ३०) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. दुचाकीस्वार तरुणाच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हिसानूर फद्दाऊस शेख (वय १९, रा. ड्रायव्हर कॉलनी, थेरगाव, मूळ- पश्चिम बंगाल) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नजमा फद्दाऊस शेख यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ट्रकचालक लहू भगवान गोयकर (रा. तुळजाईनगर, नेवाळे वस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. आरोपी हा त्याच्या ताब्यातील (एमएच १२, एचडी ५६१६) क्रमांकाचा ट्रक काळेवाडीकडून कस्पटे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याने घेऊन जात होता. दरम्यान, काळेवाडी फाटा चौक सिग्नल येथे आरोपीने त्याच्या ट्रकने हिसानूर याच्या दुचाकीला धडक दिल्याने तो ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने चिरडला गेला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केल्याने परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, वाकड पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com