महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा

महापालिकेच्या नवीन इमारतीमध्ये
अजितदादांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा
Published on

पिंपरी, ता. ३० ः दिवंगत उपमुख्यमंत्री तथा पिंपरी चिंचवड महापालिकेचे मार्गदर्शक अजितदादा पवार यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे व दूरदृष्टीपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, पिंपरी चिंचवड महापालिका एक सक्षम, आर्थिकदृष्ट्या सबळ व औद्योगिकदृष्ट्या प्रगत महानगर म्हणून उभी राहण्यामागे अजितदादा पवार यांचे नेतृत्व व मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. पाणीपुरवठा योजना, रस्ते व वाहतूक व्यवस्था, औद्योगिक विकास, नागरी पायाभूत सुविधा, जलनिस्सारण व्यवस्था तसेच महापालिकेची आर्थिक शिस्त व बळकटीकरण यामध्ये त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय शहराच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे शहराला एक स्वतंत्र व सशक्त औद्योगिक आणि नागरी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे नवीन इमारतीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. त्यामुळे त्यांच्या कार्याची आठवण कायमस्वरूपी जपली जाईल, तसेच भावी पिढीला सार्वजनिक सेवेसाठी प्रेरणा मिळेल. याबाबतचा प्रस्ताव मान्य करून संबंधित विभागास त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत.
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com