मारहाणप्रकरणी एकाला अटक

मारहाणप्रकरणी एकाला अटक

Published on

पिंपरी : जुन्या भांडणातून एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. ही घटना चिंचवडमधील पत्राशेड येथे घडली. या प्रकरणी शशिकांत नागनाथ क्षीरसागर (रा. पत्राशेड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सागर दत्ता साळवे (रा. पत्राशेड, चिंचवड) याला अटक केली आहे. आरोपी व फिर्यादी यांच्यात यापूर्वी भांडण झाले होते. त्यानंतर फिर्यादीने आरोपीला गल्लीत का आला, असे म्हणत हटकले असता या रागातून आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ केली. ‘तुला खल्लासच करतो,’ असे म्हणत फिर्यादीच्या डोक्यात कपडे धुण्याचे धोपाटणे मारून त्यांना जखमी केले.

तरुणावर कोयत्याने वार; एकाला अटक
पिंपरी : किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना मामुर्डीतील गोदरेज ग्रीनपार्क येथे घडली. या प्रकरणी विक्रमकुमार राजकुमार सहानी (रा. साईनगर, मामुर्डी) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिल बांगरिया (रा. बोपखेल) याला अटक केली आहे. सदनिका स्वच्छतेचे काम करण्याच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीसोबत वाद घालून त्यांना शिवीगाळ व धमकी दिली. तसेच कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात व हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com