उद्योगांना दिलासा देणाऱ्या निर्णय घेण्याची मागणी
पिंपरी, ता. ३१ : केंद्राच्या अर्थसंकल्पाकडून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रातील उद्योजकांना मोठ्या अपेक्षा आहेत. वाढती महागाई, करांचा बोजा आणि भांडवली अडचणी लक्षात घेता उद्योगांना दिलासा देणारे निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेकडून प्रसिध्दीस निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी सुलभ कर्ज योजना राबविण्यात याव्यात, तसेच क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टची कर्ज मर्यादा वाढविण्यात यावी. वस्तू व सेवा कर (जीएसटी) नोंदणी व रद्द करण्याची प्रक्रिया सुलभ करून उद्योगांवरील प्रशासकीय ताण कमी करावा. भाडेतत्त्वावरील जागेला आकारला जाणारा १८ टक्के जीएसटी जागेशी निगडित असल्याने तो रद्द करण्यासाठी स्वतंत्र धोरण ठरवावे.
वस्तू व सेवा कर कायद्यात पुनरावलोकनाची तरतूद करून उद्योगांना दिलासा देण्यात यावा. तसेच प्राप्तिकराच्या मर्यादा वाढवून करप्रणाली अधिक सुलभ करावी. एमएसएमई क्षेत्रासाठी विशेष सवलती जाहीर कराव्यात आणि नवीन यंत्रसामग्री खरेदीसाठी बंद केलेले अनुदान पुन्हा सुरू करून किमान १५ टक्के अनुदान द्यावे, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

