गटनेता निवडीसाठी लक्ष सुनेत्रा पवारांच्या निर्णयाकडे
पिंपरी, ता. २ ः पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्याच्या निवडीकडे शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर गटनेता निवडीचा निर्णय नेमका कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी नुकतीच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने पक्षाची सध्याची धुरा त्यांच्याच हातात राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवडही त्यांच्या निर्णयावरच अवलंबून आहे.
दरम्यान, पुढील प्रक्रिया घाईत न करता चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असेही संकेत पक्षांतर्गत दिले जात आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीचे ३७ नगरसेवक आहेत. गटनेत्याची जबाबदारी अनुभवी नगरसेवकाकडे दिली जाणार की युवा नगरसेवकाला संधी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी महत्त्वाची मानली जाणारी ही निवड नेमकी कोणाच्या खांद्यावर सोपवली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
गटनेता निवडीबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. अद्याप त्यांच्याशी चर्चा झालेली नाही.
- योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पिंपरी चिंचवड
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

