एक लॉज, दोन स्पा सेंटर एक वर्षासाठी बंद

एक लॉज, दोन स्पा सेंटर एक वर्षासाठी बंद

Published on

एक लॉज, दोन स्पा सेंटर
वर्षभरासाठी बंद
पिंपरी, ता. ३ : वेश्या व्यवसाय सुरु असलेला एक लॉज व दोन स्पा सेंटर एक वर्षासाठी बंद करण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर चौकशीअंती जानेवारी महिन्यात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये चिंचवड परिसरातील ‘निक्की लॉज’, काळेवाडी परिसरातील ‘लेमन ग्रास थाई स्पा’ सांगवी परिसरातील ‘औरा थाई स्पा’वर ही कारवाई झाली. अशाप्रकारे गेल्या वर्षी अशी एकूण आठ ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. यामध्ये सहा स्पा सेंटर, एक लॉज व एका सदनिकेचा समावेश आहे.
--------------

स्पा सेंटररमधून
चार महिलांची सुटका
पिंपरी, ता. ३ : पिंपळे निलख, विशाल नगर, जगताप चौक येथील इंटरनल फॅमिली स्पा येथे पोलिस पथकाने सोमवारी (ता. २) रात्री छापा टाकला. तेथे वेश्याव्यवसाय सुरु होता. येथून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी स्पा चालक महिलेसह स्पा व्यवस्थापक अब्दुल मोहमद हुसेन कलाम (रा. विशाल नगर, पिंपळे निलख, मुळ- आसाम) याच्यावर वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अब्दुलला अटक केली आहे.
----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com