मिळकतकर भरा; जप्ती टाळा
पिंपरी, ता. ४ ः ‘‘मिळकत कर संकलनासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. कर भरण्याबाबत जनजागृती मोहीम, थकबाकीदारांविरोधात जप्तीची कारवाई सुरू आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ७०२ कोटी ७३ लाख रुपये कर वसुली झाली आहे. आर्थिक वर्ष संपायला अवघे पावणेदोन महिने बाकी आहेत. नागरिकांनी लवकरात लवकर कर भरावा अन्यथा जप्तीची कारवाई केली जाईल’’, असा इशारा महापालिका करआकारणी व करसंकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने एक एप्रिल २०२५ ते दोन फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ७०२ कोटी ७३ लाख रुपयांचा मिळकतकर वसूल केला आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेतली आहे. कर वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात आहे. ऑनलाइन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तसेच कर भरण्याबाबत एसएमएस, नोटिसा व प्रत्यक्ष भेटीद्वारे नियमित पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे करवसुलीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे.
विभागीय कार्यालयनिहाय करवसुली
(एक एप्रिल २०२५ ते दोन फेब्रुवारी २०२६)
विभागीय कार्यालय / करवसुली (कोटी रुपयांत)
वाकड / ८७.४४
चिंचवड / ४५.४९
चिखली / ५४.२७
वाकड / ४९.९८
मनपा भवन / ३४.२१
भोसरी / ४४.९१
सांगवी / ३५.२६
मोशी / ४३.५२
पिंपरी वाघेरे / ४२.०२
किवळे / ४७.८७
थेरगाव / ६९.०३
चऱ्होली / २७.२१
प्राधिकरण / १५.६५
पिंपरीनगर / ५.७८
आकुर्डी / ३२.९४
दिघी बोपखेल / २१.४०
तळवडे / १७.६३
फुगेवाडी दापोडी / २८.१०
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने करवसुलीसाठी नियोजन केले होते. नागरिकांचाही प्रतिसाद वाढला आहे. वेळेत कर भरण्यासाठी सवलती जाहीर केल्या होत्या. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात कर संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. यातून शहराच्या विकासासाठी नागरिकांनी दाखवलेल्या जबाबदारीची साक्ष आहे. उर्वरित मालमत्ताधारकांनीही वेळेत कर भरून शहराच्या विकासात आपले योगदान द्यावे.
- तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

