

नाल्याची स्वच्छता करावी
रावेत येथील भोंडवे वस्ती ते समीर लॉन्स दरम्यान असलेल्या नाल्यांची दुरवस्था झाली आहे. या नाल्याची अनेक महिन्यांपासून सफाई केलेली नाही. त्यामुळे नाल्यात गवत वाढले आहे तसेच परिसरातील नागरिक घरगुती कचरा देखील या नाल्यात टाकतात. कचरा कुजल्यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. येथे लोकवस्ती असल्याने डेंगी, मलेरिया अशा आजारांचा धोका वाढला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या समस्येची दखल घेऊन नाल्याची स्वच्छता करावी तसेच येथे कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE26V92919
सांडपाणी वाहिनीचे काम पूर्ण; राडारोडा तसाच
पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर परिसरातील लाइन क्रमांक तीन या भागात महापालिकेने नुकतेच सांडपाणी वाहिनीचे काम केले आहे. मात्र, हे काम पूर्ण झाल्यावर देखील रस्त्यावर डबर तसेच इतर कचरा आणि राडारोडा तसाच ठेवला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने येथील राडारोडा आणि कचरा उचलून परिसर स्वच्छ करावा.
-अजित घुगरे, पिंपळे गुरव
PNE26V92917
समतल विलगक खड्डेमय
दापोडी निगडी रस्त्यावरील पिंपरी समतल विलगकात खड्डे निर्माण झाले आहेत. या ठिकाणी खड्डे आणि पाणी गळतीमुळे रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे येथे वाहने आल्यानंतर वाहनांची गती कमी होते आणि वारंवार अपघात घडतात. त्यामुळे पालिकेच्या संबंधित विभागाने या समस्येची त्वरित दखल घ्यावी. रस्त्यावर येणाऱ्या पाण्याची चाचपणी करून या पाण्याला बाहेरील बाजूंनी असलेल्या नाल्यातून मार्ग मोकळा करून द्यावा. तसेच पेवर ब्लॉक मुळे झालेल्या खड्ड्यात डांबर भरून अपघात मुक्त समतल विलगक करण्यात यावे.
-बी. एस. पाटील संभाजीनगर
PNE26V92918
स्वानंद, प्रेमलोक पार्क सोसायटी परिसरातील पथदिवे बंद
चिंचवड येथील स्वानंद सोसायटी तसेच प्रेमलोक पार्क सोसायटी येथे मागील तीन-चार दिवसांपासून सोसायटी परिसरातील पथदिवे बंद आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी नागिरकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने येथील पथदिव्यांची पाहणी करून पथदिवे त्वरित चालू करावे.
संतोष कोठारी, चिंचवड
PNE26V92921
अतिक्रमणामुळे पदपथ अस्वच्छ
आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला महापालिकेने स्वच्छ आणि प्रशस्त असे पदपथ तयार केले आहेत. पण त्याच्यावर अनेक महिन्यांपासून भीक मागणाऱ्या लोकांनी कब्जा केला आहे. हे लोक पदपथावरच स्वयंपाक, अंघोळ अशी सर्व कामे करतात. त्यामुळे पदपथावर अस्वच्छता पसरली आहे. या लोकांचे पदपथावरच वास्तव्य आहे. येथून पादचाऱ्यांना नाक बंद करून तसेच पदपथाच्या खालून चालावे लागते. रेल्वे स्थानक असल्यामुळे येथे सतत वर्दळ असते. त्यामुळे महानगरपालिकेने कायमस्वरूपी उपाययोजना करून येथील लोकांचा योग्य तो बंदोबस्त करावा.
- संदीप मोरे,आकुर्डी
PNE26V92916
तळेगावातील पदपथाची दुरवस्था
तळेगाव येथील एम.आय.एम.इ.आर. मेडिकल प्रवेशद्वारापासून शिवाजी चौकापर्यंत पदपथावरील चेंबरला झाकणे नाहीत, तसेच पूर्ण पदपथ उखडलेला आहे. यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते याने अपघाताचा धोका संभवतो. तळेगाव नगरपरिषदेने चेंबरची आणि पदपथाची दुरुस्ती करावी.
- रमेश देव, यशवंतनगर, तळेगाव
PNE26V92913
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.