‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’
पिंपरी, ता.५ : शहरातील गणेश मंदिरांमध्ये संकष्ट चतुर्थी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सर्वच ठिकाणी सकाळपासूनच भक्तांनी विशेष पूजा करत प्रार्थना केली. मंदिरांमध्ये आकर्षक फुलांची आरास, गणपतीला मोदकांचा नैवेद्य, दुर्वा आणि फुले अर्पण करण्यात आली. ‘ओम् गं गणपतये नमः’, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ अशा जयघोषाने मंदिरांचे परिसर दुमदुमले.
श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. यासह चिंचवड, निगडी, सांगवी, काळेवाडी, भोसरी, शाहुनगर, संभाजीनगर आदी परिसरांतील गणेश मंदिरांत विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक, श्री गणेशयाग यांसारखे धार्मिक विधी भक्तिभावात पार पडले. मंदिरात गणेशाची मूर्ती आकर्षक पद्धतीने सुंदर फुलांनी सजवली होती. गाभाऱ्यापर्यंत झेंडू, गुलाब, शेवंती आदी विविधरंगी फुलांनी केलेली सजावट वातावरण प्रसन्न करत होती. काही मंदिरांत पारंपरिक शैलीत साकारलेली ही पुष्पसजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला होता. सभामंडपातही सुबक आणि देखणी फुलांची आरास केली होती.
मंदिरात संकटनाशन स्तोत्रपठण
मंदिरात ‘संकटनाशन’ स्तोत्राचे पठण करण्यात आले. आरतीसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ठिकठिकाणी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. मंदिरावर आकर्षक तोरणे, रांगोळ्या आणि सजावटीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. मंत्रांचा जप, भजने आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले होते.
महाप्रसादाचे वाटप
मंदिरांमध्ये भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी मोदकांचा नैवेद्य दाखवला. भाविकांनी पहाटेपासून ते चंद्रोदयापर्यंत उपवास पाळला. उपवास सोडून सायंकाळी चंद्र दर्शनानंतर पूजा पूर्ण करण्यात आली. मंदिरात अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

