अलार्ड विद्यापीठात यिन क्लबची स्थापना यिन क्लबची स्थापना
पिंपरी, ता.५ : मारुंजी येथील अलार्ड विद्यापीठात सकाळ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) क्लबची अधिकृत स्थापना करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी उद्योजकता आणि सायबर सुरक्षा या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान घेण्यात आले.
अलार्ड विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सोहन चितलांगे यांनी यिन क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैयक्तिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सामाजिक क्षेत्रात मार्गदर्शन मिळेल, असे सांगत यिन क्लबचे महत्त्व अधोरेखित केले. स्वप्निल खारडे यांनी ‘उद्योजकता’ यावर तर अनिल राज यांनी ‘‘सायबर सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन केले. यिनचे प्रमुख शामसुंदर माडेवार यांनी यिन मंत्रीमंडळाची माहिती दिली.
यावेळी युगंधरा कंग्राळकर यांनी यिनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. अलार्ड विद्यापीठाचे कार्यकारी संचालक डॉ. आर. एस. यादव व अध्यक्ष डॉ. एल. आर. यादव यांनी यिन क्लबला शुभेच्छा दिल्या. अर्पिता शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. यिन कोअर टीम सदस्य प्रणव भोसले, ऋतिक कांबळे व श्रेयश हांडे यांनी सहकार्य केले. डॉ. पद्मा झाडे व प्रा. सपना नांगरे यांनी कार्यक्रमासाठी समन्वय साधला. यिन अधिकारी चेतन लिम्हण यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

