पूर्ण क्षमतेने वाहतुकीपूर्वीच 
गहूंजे पूल धोक्यात

पूर्ण क्षमतेने वाहतुकीपूर्वीच गहूंजे पूल धोक्यात

Published on

सोमाटणे, ता. १० : पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू होण्याअगोदरच गहूंजे पुलाचे संरक्षक कठडे कोसळल्याने हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १० कोटी ९७ लाख १६ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीतून पाटबंधारे विभागाने गेल्या मे महिन्यात गहूंजे पुलाचे काम पूर्ण केले होते. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतरही पुलाच्या पुढील बाजूच्या रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, यावर्षी झालेल्या जोरदार पावसात पूल पाण्याखाली गेला होता. नदीच्या तीव्र प्रवाहामुळे पुलाचे लोखंडी संरक्षक कठडे वाहून गेले. पाऊस उघडताच पाटबंधारे विभागाने तातडीने कठड्यांची दुरुस्ती केली. मात्र, रस्त्याचे काम सुरू असल्याने या पुलावरून केवळ दुचाकी व हलक्या वाहनांचीच वाहतूक सुरू करण्यात आली होती. अशी मर्यादित वाहतूक सुरू असतानाच, रात्रीच्या वेळी एका अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेमुळे दुसऱ्यांदा पुलाचे संरक्षक कठडे कोसळले. परिणामी, हा पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने या पुलावरून अद्याप पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झालेली नाही. मात्र, वाहतूक सुरू होण्याआधीच कठडे कोसळल्याने अपघाताचा धोका वाढला असून, तातडीने दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

PNE26V94505
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com