पारा पुन्हा ४१ अंशाकडे!

पारा पुन्हा ४१ अंशाकडे!
Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ ः गेल्या तीन दिवसांपूर्वी शहरातील किमान आणि कमाल तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने घसरले होते. उकाड्यामुळे असह्य झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता, पण, सोमवारी (ता. ११) पारा ४०.७ अंशावर गेल्यामुळे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे.
राज्यात या वर्षी सर्वच जिल्ह्यांत तापमानाचा पारा चढला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पारा ४६ अंशांवर गेला आहे. पिंपरी चिंचवड शहरातही एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तापमानात प्रचंड वाढ झाली होती. या मोसमातील सर्वोच्च ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
त्यानंतर ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे पारा घसरला होता. मात्र गेल्या आठवड्यापासून पुन्हा कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ झाली आहे. किमान तापमान २७ अंश सेल्सिअसवर गेले आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्रीही मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. दुपारी पारा ४० अंशापार गेल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे.
गेल्या आठवड्यातील सर्वात कमी ३६.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद मंगळवारी (ता. ५) झाली होती. आता पुन्हा तापमान वाढत आहे. सोमवारी किमान २७ अंश सेल्सिअस आणि कमाल ४०.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या आठ दिवसांत कमाल तापमानात ४.५ आणि किमान तापमानात ४ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रामुख्याने लहान मुलांबरोबर ज्येष्ठ नागरिकांना उष्णतेचा त्रास होत आहे.
-------
आठ दिवसांतील तापमान
वार - किमान - कमाल
मंगळवार - २३.४ - ३६.५
बुधवार - २३.५ - ३८.६
गुरुवार - २४.८ - ३८.९
शुक्रवार - २६.२ - ३८.२
शनिवार - २६.६ - ३७.६
रविवार - २४.८ - ३९.९
सोमवार - २७.० - ४०.७
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com