

पिंपरी, ता. १८ ः महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कडून घरगुती व व्यावसायिक पुरवठा केला जातो. पिंपरी चिंचवड शहरात लाखो ग्राहक आहेत. दरम्यान, या ग्राहकांना एमएनजीएलच्या टोल फ्री संपर्क क्रमांकाचा अजब अनुभव येत आहे. प्रतिसाद न देणे, तक्रारी व्यवस्थित नोंदवून न घेणे असे प्रकार घडत असल्याने नेमकी तक्रार करायची कुठे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
पिंपरी चिंचवड परिसरात जवळपास साडेतीन लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. तसेच, येत्या काळात त्यात आणखी वाढ देखील होत आहे. तसेच, अलीकडे वाहनांसाठी स्वतंत्र सीएनजी पंप देखील उभारले जात आहेत. गॅसचा पुरवठा विस्कळीत होत असल्याने तसेच, दाब कमी झाल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तर, दुसरीकडे याबाबत तक्रार द्यायची झाल्यास ‘एमएनजीएल’च्या तक्रार क्रमांकावर व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. दरम्यान, काही ग्राहकांनी बिलाबाबत देखील तक्रारी केल्या असून, मीटर रीडिंग व बिलामध्ये तफावतीमुळे ग्राहक त्रस्त आहेत.
दरम्यान, वाकड परिसरामध्ये सकाळी काही काळ ही सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. मात्र, संबंधित एकाच परिसरातील सोसायटीत तांत्रिक दोष असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवडमध्ये कोठेही सेवा बंद नाही. तसेच, ‘सीएनजी’ पंप हे केवळ देखभाल दुरुस्तीसाठी काही तास बंद होते. मात्र, त्याचा पुरवठ्याचा संबंध नसल्याचे ‘एमएनजीएल’ अधिकारी जितेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.
----
तक्रारीची आकडेवारी देण्यास नकार
एमएनजीएलच्या नागरिकांच्या तक्रारीबाबत ‘ग्रीव्हन्स’ कार्यालयात काही ग्राहकांनी संपर्क केला असता, त्यांनी ग्राहकांच्या तक्रारी, त्याचा तपशील देण्यास नकार दिला. संबंधित माहिती देता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तक्रारींची माहिती लपवली जात नाही ना, असा संशय निर्माण झाला आहे.
‘एमएनजीएल’ त्रुटीबाबत टोल फ्रीवर आज संपर्क केला होता. तेथून व्यवस्थित माहिती दिली गेली नाही. केवळ दुरुस्तीसाठी १ तास लागेल, असे कळवले.
- तक्रारदार, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.