‘आरटीई’ कागदपत्रे पडताळणी केंद्रावर गोंधळ

‘आरटीई’ कागदपत्रे पडताळणी केंद्रावर गोंधळ
Published on

पिंपरी, ता.१६ : ‘आरटीई’ प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणी केंद्रावर आकुर्डी येथील कै. वसंतदादा पाटील विद्यामंदिर सलग दुसऱ्या दिवशी गोंधळ निर्माण झाला. टोकन मिळवण्यासाठी भर उन्हात रांगेत थांबलेल्‍या पालकांचे हाल झाले. दरम्‍यान, पालकांच्या गोंधळांची माहिती मिळताच महापौर रवी लांडगे यांनी तेथे धाव घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

‘आरटीई’ प्रवेशासाठी लॉटरी निघून १० एप्रिलपासून कागदपत्रे तपासणीला सुरुवात झाली असली, तरी महापालिकेच्या शिक्षण विभागातील नियोजनशून्य आणि व्यक्तिनिष्ठ कारभाराचा फटका पालकांना बसत आहे. पडताळणीची मुदत २० एप्रिलपर्यंत आहे. कागदपत्रे तपासणीशिवाय शाळा विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाहीत. इतक्या कमी मुदतीत पालकांना कागदपत्रातील त्रुटी आणि दुरुस्ती करण्याचा वेळ नसणार. यासाठी टोकन घेणारे आणि कागदपत्रे घेवून आलेल्या पालकांची एकच गर्दी झाली होती. काही टोकन नसणाऱ्या पालकांचे देखील अर्ज भरून घेतल्याने पालकांमध्ये गोंधळ सुरू झाला. तर, कागदपत्रे पडताळणीची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे पडताळणीचे नियोजन बिघडले आहे, असे पालकांचे म्हणणे आहे. दरम्यान, महापौरांनी पाहणी केल्यानंतर पालकांना सुविधा देण्याच्या सूचना केल्या. कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने या ठिकाणी मंडप आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यास सांगितले आहे.

आम्ही एक हजार पालकांना टोकन दिले आहेत. आज इंटरनेट बंद होते, संकेतस्थळ हळू सुरू होते. केंद्रावर कागदपत्रे जमा करणारे, टोकन घ्यायला येणारे आणि पालक टोकनवरची तारीख न पाहता आधीच येणारे पालक यांच्यामुळे गर्दी होते.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com