

सोमाटणे, ता. १८ ः कडक उन्हाळा आणि गॅस सिलिंडर समस्येमुळे खाद्यपदार्थांचे वाढलेले दर यामुळे कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्याने हॉटेल व्यावसायिक, कृषी पर्यटन केंद्र चालक, छोटे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.
पर्यटनासाठी बोटिंगची सोय, पोहण्याचे तलाव, मावळी जेवण, निवासाची सोय, सगळीकडे बहरलेले हिरवेगार मळे आदी कारणांमुळे दरवर्षी उन्हाळ्यात कासारसाई धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यात आयटी पार्कमधील तरुण नोकरदारांची संख्या अधिक असते. या वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे स्थानिकांना येथे चांगला रोजगार, व्यवसाय मिळतो. परंतु यावर्षी गॅस टंचाईमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले असून त्यांनी जेवणाचे दर वाढवल्याने ते पर्यटकांना रुचले नाही. त्यातच मार्च महिन्यापासून तापमानाचा पारा अचानक वाढला आहे. सध्या तापमान चाळीस अंशापर्यंत पोहोचले आहे. या वाढत्या तापमानामुळे आरोग्यावर परिणाम होऊ नये, यासाठी सुट्टीच्या दिवशीही अनेक पर्यटकांनी घरीच राहणे पसंत आहे. त्याने हॉटेल व्यावसायिक, कृषी पर्यटन केंद्र चालक, छोट्या व्यावसायिकांसमोर कामगारांचा खर्च भागवण्याची समस्या निर्माण झाली आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून तापमान वाढीमुळे पर्यटकांची संख्या घटली आहे. सध्या व्यवसायातून केवळ खर्चच भागला
जात आहे. नफाच मिळत नाही.
- बाळासाहेब केदारी, बोट व्यावसायिक, कुसगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.