‘नॉव्हेल इंटरनॅशनल’चा दहावीचा १०० टक्के निकाल

‘नॉव्हेल इंटरनॅशनल’चा दहावीचा १०० टक्के निकाल
Published on

पिंपरी, ता.१८ ः नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने इयत्ता दहावीच्या सीबीएसईच्या परीक्षेत १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. यंदाही २०२५-२६ वर्षातील परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला. राज वैद्य याने ९७ टक्के मिळवून पहिला क्रमांक पटकाविला.
वैष्णवी राठोड आणि सोनम शिंदे यांनी ९५ टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर, अर्जुन ठाकरे आणि पदमज देसाई यांनी ९४.८० गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. परीक्षेला एकूण १४३ विद्यार्थी परीक्षेला बसले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष आमदार अमित गोरखे, संस्थेचे कार्यकारी संचालक विलास जेऊरकर, शाळा व्यवस्थापक डॉ. प्रिया गोरखे, संसाधन व्यवस्थापक समीर जेऊरकर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
निकालाचा आढावा : ९१ टक्क्यांपेक्षा अधिक गुण - १८ विद्यार्थी, ८१ टक्क्यांपेक्षा अधिक - ५८ विद्यार्थी, ७१ टक्क्यांपेक्षा अधिक - ४४ विद्यार्थी, ६१ टक्क्यांपेक्षा अधिक - २० विद्यार्थी, ५१ टक्क्यांपेक्षा अधिक ३ विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com