

लोकसभेमध्ये तथाकथित महिला विधेयक फेटाळले गेल्याने महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकांनी काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी ‘या सरकारचे करायचे काय ?, खाली डोके वर पाय’, अशा घोषणा दिल्या. यालाच म्हणतात हात दाखवून अवलक्षण. या नगरसेविकांनी चक्क आपल्याच सरकारच्या विरुद्ध घोषणा दिल्या. त्यांना याचेही भान राहिले नाही की केंद्र आणि राज्यातील सरकार एकाच आघाडीचे आहे. नगरसेविकांपैकी बहुतेकांचे वाचन, अभ्यास दिसत नाही. यापुढे तरी सत्ताधारी पक्षाने कुठलेही आंदोलन करण्यापूर्वी संबंधित नगरसेवकांना/ नगरसेविकांना योग्य ते मार्गदर्शन करावे. मग, आंदोलन हाती घ्यावे. अन्यथा असे फजितीचे प्रकार पुढे भविष्यातही घडतील.
- सुरेश लुनावत, किवळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.