हिंदू राष्ट्रासाठी संघटित व्हा

हिंदू राष्ट्रासाठी संघटित व्हा
Published on

पिंपरी, ता.२१ ः ‘‘हिंदू धर्म वाचवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. धर्म म्हणजे ईश्वराच्या प्राप्तीचे विज्ञान असून हिंदू राष्ट्रासाठी संघटित व्हावे’’, असे आवाहन प्रमुख वक्ते कालिचरण महाराज यांनी हिंदू बांधवांना केले.
नेवाळे वस्तीतील धर्मरक्षक भुजबळ प्रांगणात पार पडलेल्या विराट हिंदू संमेलनात बोलत होते. या संमेलनाला चिखली आणि पिंपरी चिंचवड परिसरातील हरिपाठ व भजनी मंडळे, सर्व महिला बचत गट, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघासहित हजारो हिंदू बांधव, माता-भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कालिचरण महाराज म्हणाले, ‘‘भारताला हिंदू राष्ट्र बनवणे ही काळाची गरज आहे. डाळ-तांदळाच्या भावासाठी रडणारी वृत्ती सोडली पाहिजे. हिंदूंनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन श्रीमंत व्हावे. तरच देश आणि धर्म श्रीमंत होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८० वर्षांपूर्वीच मुसलमानांच्या निष्ठेवर आणि शरिया कायद्यावर भाष्य केले. त्यांचे पुस्तक वाचून त्यांचा भक्त झालो आहे.’’
तत्पूर्वी ढोल-ताशांच्या गजरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन झाले. पारंपरिक युद्धकला तलवारबाजी व दांडपट्टा मर्दानी खेळांचे सादरीकरण झाले. संयोजक दत्तात्रेय ढोले पाटील यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com