

पिंपरी, ता. २२ ः महापालिकेतर्फे किवळे येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृहप्रकल्प उभारला आहे. त्यातील ७५ सदनिकांची संगणकीय सोडत महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते काढण्यात आली. लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरुपात पत्रांचे वाटप केले. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आदी उपस्थित होते. विजेत्या लाभार्थ्यांनी स्वहिस्सा रक्कम भरणे व अनुषंगिक बाबींसाठी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागात संपर्क साधावा, असे आवाहन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले. आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ‘‘शहरातील आर्थिक दुर्बल घटकांना सुरक्षित निवारा देणे महापालिकेची प्राधान्याची बाब आहे. या प्रकल्पांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि वेळेचे काटेकोर पालन केले जात आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.