महिलेची २४ लाखांची ऑनलाइन फसवणूक

महिलेची २४ लाखांची 
ऑनलाइन फसवणूक
Published on

पिंपरी : टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली पैसे भरण्यास सांगून महिलेची २४ लाखांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार वाकड येथे घडला. या प्रकरणी काळेवाडी फाटा येथील ४७ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी फिर्यादी यांना व्हाट्सॲपवरून एचआर मेगा इंडिया लिमिटेडकडून पैसे कमविण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर टेलिग्रामवर टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली वेळोवेळी रक्कम भरण्यास प्रवृत्त केले. फिर्यादीने विश्वास ठेवून विविध बँक खात्यावर २४ लाख २८ हजार रुपये पाठविले. त्यानंतर त्यांना आणखी २३ लाख रुपये भरण्यास सांगितले असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

मारहाणप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : पारवा पकडण्यासाठी तारेचा फासा लावल्याच्या कारणावरून तरुणाला दांडक्याने मारल्याची घटना डुडुळगाव येथे घडली. या प्रकरणी मिथुन बिरसिंग राठोड (रा. हवालदार वस्ती, मोशी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी ज्ञानेश्वर अशोक कव्हर (रा. डुडुळगाव) याला अटक केली आहे. पारवा पकडण्यासाठी तारेचा फासा लावल्याने आरोपीने फिर्यादीला दांडक्याने बेदम मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले.

कासारवाडीत दोन पिस्तूल जप्त; दोघांना अटक
पिंपरी : कासारवाडीतील सांगवी-भोसरी उड्डाणपुलाखाली दापोडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोघांकडून दोन पिस्तूल जप्त केले. यश नंदकिशोर कांबळे (रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव), अथर्व सुनील भोकरे (रा. संत तुकारामनगर, नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून एक लाख ३१ हजार रुपये किमतीची दोन पिस्तूले, सहा काडतूस पोलिसांनी जप्त केले आहेत.

अल्पवयीन मुलाकडून पिस्तूल जप्त
पिंपरी : पिंपरी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून एक पिस्तूल जप्त केले. ही कारवाई पिंपरी पुलाजवळ करण्यात आली. या मुलाकडे चौकशी केली असता त्याने हे पिस्तूल पप्पीसिंग (रा. उमरटी, मध्य प्रदेश) याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com