व्हेरॉक-वेंगसरकर, ट्रिनिटी यांच्यात जेतेपदाची लढत

व्हेरॉक-वेंगसरकर, ट्रिनिटी यांच्यात जेतेपदाची लढत
Published on

पिंपरी, ता. २३ ः पीसीएमसीज व्हेरॉक क्रिकेट अकादमीतर्फे थेरगाव येथे आयोजित १४ वर्षांखालील ‘व्हेरॉक करंडक’ क्रिकेट स्पर्धेत यजमान संघासह ट्रिनिटी अकादमीने अंतिम फेरीत प्रवेश केला. या दोन्ही संघांत आता शुक्रवारी (ता.२४) अंतिम सामना होणार आहे.
स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकादमी संघाने यंगस्टर्स अकादमीवर ९३ धावांनी दणदणीत मात केली. विजयी संघाचा अभ्युदय म्हसटकर सामन्याचा मानकरी ठरला.
दुसऱ्या उपांत्य सामन्यात ट्रिनिटी अकादमीने स्पार्क स्पोर्टिव्ह क्रिकेट अकादमीवर ५८ धावांनी विजय मिळविला. अष्टपैलू खेळाडू गुरू राजोळे सामनावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक
ट्रिनिटी ः ३९.१ षटकांत सर्वबाद १४७ - प्रणव नेवाळे २६, द्विजेश ढवळे २२ (समर रेवाळे ४-२१, आर्ष मिश्रा २-२२) वि.वि. स्पार्ट स्पोर्टिव्ह ः ३० षटकांत सर्वबाद ८९ (तनिष ढाणे ३-१८, गुरू राजोळे २-६).
व्हेरॉक-वेंगसरकर ः ४० षटकांत ८ बाद २२५ - अभ्युदय म्हसटकर ८९, अविनाश गायकवाड ३२, वेदांत मराठे ३१ (नीरव एस.२-४२) वि.वि. यंगस्टर्स ः ३६.३ षटकांत सर्वबाद १३२ - सन्मित शेटाणे ३६, कौस्तुभ पटाले ३१ (वेदांत खेळगी ५-१४, शौर्य कांबळे २-१८).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com