सेवा रस्त्याचा प्रस्ताव लाल फितीत

सेवा रस्त्याचा प्रस्ताव लाल फितीत
Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. २३ ः मोशीतील दहा एकर जागेत अत्याधुनिक स्वयंचलित चाचणी केंद्राचे (ॲटोमॅटिक टेस्टिंग सेंटर) काम पूर्ण होऊन पाच महिने झाले, तरी केवळ सेवा रस्ता आणि विजेअभावी ते बंद आहे. प्रादेशिक परिवहन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाअभावी ही दोन्ही कामे लाल फितीत अडकली आहे. या कामांना कधी मुहूर्त लागणार, असा संतप्त सवाल वाहन चालक विचारत आहेत.
ऑक्टोबर २०२५ दरम्यान या केंद्राचे आणि इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. केंद्रात यंत्रे बसविण्याचे तांत्रिक काम, प्लंबिंग, इलेक्ट्रीक कामे आणि बाहेरील लेव्हलींगचे काम पूर्ण झाले. त्यास पाच महिने उलटूनही केंद्र बंद आहे. हे काम मोठा गाजावाजा करत सुरु झाले. बांधकाम सुरु केले तेव्हा मागील बाजूस असलेल्या सोसायटीच्या जागेवरून बांधकाम साहित्य घेऊन येणारी वाहने ये-जा करत होती. पण, कालांतराने सोसायटीच्या सभासदांनी याला विरोध केला. त्यामुळे प्रश्‍न निर्माण झाला. बांधकाम आराखड्यात रस्त्याची तरतूदच केली नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. त्यानंतर आरटीओ प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्ता करून देण्याची मागणी केली. त्यासाठी प्रस्ताव देखील पाठवला. पण, या प्रस्ताव लाल फितीत अडकल्यामुळे अजूनही रस्त्याचे काम सुरु झाले नाही.

सेवा रस्ता आणि वीज जोडणी देण्याबाबतचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवला आहे. ही दोन्ही कामे झाल्याशिवाय स्वयंचलित चाचणी केंद्र सुरु करता येणार नाही.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

सेवा रस्त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल.
- प्रशांत खैरमोडे, कार्यकारी अभियंता
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com