

पिंपरी, ता. २३ ः मेट्रो आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ यांच्यातर्फे मेट्रो फिडर बससेवा सुरू करण्यात आली आहे. पीसीएमसी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा या दरम्यान ही बस (बस मार्ग क्र. ३१) धावणार असून त्यामुळे मेट्रो प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि स्वस्त होणार आहे.
हा नवीन बस मार्ग काळेवाडी, रहाटणी, विजयनगर, तापकीरनगर, श्रीनगर, धनगरबाबा वस्ती, आणि ज्योतिबानगर यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांना जोडणार आहे.
फिडर बस सेवेचा मुख्य उद्देश नागरिकांना त्यांच्या घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत आणि स्थानकापासून त्यांच्या घरापर्यंत पहिली आणि शेवटची मैल कनेक्टिव्हिटी देणे हा आहे. यामुळे खाजगी वाहनांचा वापर कमी होऊन वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.