

पीएमपीएमएल बससाठी चिंचवड मार्ग खुला करा
महावीर चौकातून चापेकर चौकाकडे जाणारा चिंचवड रेल्वे उड्डाण पूल गेल्या जवळपास दोन वर्षांपासून जड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पीएमपीएमएल बससेवा देखील या मार्गावरून चिंचवडगावात जात नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. विशेषतः अहिंसा चौकातून चिंचवडगावात प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा मार्ग चापेकर चौकातून अहिंसा चौकाकडे सर्व वाहनांसाठी खुला असून, केवळ अर्धा भाग बंद ठेवण्यात आलेला आहे. तसेच बंद असलेल्या भागाची दुरुस्तीही करण्यात आल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांची व प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता, संबंधित प्रशासनाने किमान पीएमपीएमएल बससेवेसाठी तरी हा मार्ग तातडीने खुला करण्याचा विचार करावा.
- विवेक मैत्र, चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.