शहरातील गुन्हेगारी विषयक बातम्या

शहरातील गुन्हेगारी विषयक बातम्या
Published on

मारहाणप्रकरणी तिघांवर गुन्हा

पिंपरी : चहाचे बिल मागितल्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ताथवडे येथे घडला. या प्रकरणी अनिल काशिनाथ काळगे (रा. गजानननगर, रहाटणी फाटा, रहाटणी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी महेश साळवे व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे त्यांच्या सहकारी सोबत चहाच्या टपरीवर असताना तेथे आलेल्या आरोपीने चहा घेतला. त्याचे ४५ रुपयांचे बिल मागितल्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला बेदम मारहाण केली.

पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला वाकड पोलिसांनी अटक केली. ही कारवाई ताथवडे येथे करण्यात आली. महेश गंगाधर साळवे (रा. मुंजोबानगर, वाकड) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक काडतूस पोलिसांनी जप्त केले.

दगडावर ढकलून दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : किरकोळ कारणावरून तरुणाला शिवीगाळ करून दगडावर ढकलून देत गंभीर जखमी केले. हा प्रकार निघोजे येथे घडला. या प्रकरणी गणेशकुमार राजकुमार केवट (रा. जामदार वस्ती, निघोजे) यांनी दक्षिण महाळुंगे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी युवराज जोशी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व आरोपी हे फिर्यादीचा मित्र मुकेश यांच्याकडे मोबाईल चार्जिंगसाठी देवून दारू पिण्यासाठी बसले होते. मुकेश हा वेळेवर मोबाईल घेऊन आला नाही, या कारणावरून आरोपीने फिर्यादीशी वाद घालून शिवीगाळ केली. दगडावर ढकलून त्यांना गंभीर जखमी केले.

तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक
पिंपरी : जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलेले असतानाही शहरात आलेल्या तडीपार गुंडाला बावधन पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले. ही कारवाई बावधनमधील मुकाई वस्ती येथे करण्यात आली. राहुल सुरेश गोणते (रा. भूगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com