

निगडी, ता.२६ ः तळवडेतील ज्योतिबानगर - चिखली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण पूर्णपणे उखडल्यामुळे धुळीचे प्रदूषण वाढले असून दररोजचा प्रवास करणाऱ्या लघुउद्योजक कामगारांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण केले जावे, अशी मागणी कामगार, लघुउद्योजक आणि नागरिकांकडून होत आहे.
या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर लघुउद्योग असल्यामुळे सतत जड- अवजड वाहने तसेच छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात कामगार या रस्त्यावरून ये-जा करत असतात. चिखली भागात वास्तव्यास असलेले अनेक कामगार मधल्या रस्त्याने तळवडे- ज्योतिबानगरकडे जातात. येथील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे सोनवणे वस्ती, ज्योतिबानगर हा औद्योगिक पट्टा व नागरी वस्त्यांमधील अंतर्गत रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण केले जावे. रस्ते खड्डेमुक्त केले जावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे धुळीचे प्रदूषण वाढले असून त्याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती व्हावी, अशा प्रकारची मागणी कामगार, उद्योजक व स्थानिक नागरिकांनी केली आहे.
याबाबत बोलताना मनेश भालेकर म्हणाले, ज्योतिबानगर व सोनवणे वस्तीतील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे त्याचा स्थानिक नागरिक व रोजच्या प्रवास करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही भागांत खड्डे पडल्याने अचानक येणाऱ्या पावसानेही पाणी साचत आहे. सांडपाणीही अशा खड्ड्यांत साचून अपघात घडत आहेत. त्यामुळे रोजचा प्रवास करणे ही एक कसरत होऊन बसली आहे. या भागांत मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. संपूर्ण परिसरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण व्हावे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.