सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

धोकादायक वळणावर उपाययोजनांची गरज

भोसरी किंवा नाशिक फाटा मार्गे जाताना वाहनांना वळण घेण्यासाठी सीआयआरटी समोरून वळण घ्यावे लागते. वळण घेताना कुठलाही सूचना फलक आणि सिग्नल यंत्रणा येथे कार्यान्वित नाही. रस्त्याच्या मधोमध हे वळण असल्याने तसेच पुण्याकडून येणारे वाहने पुलावरून वेगात येत असल्याने, रात्रीच्या वेळी मागून येणाऱ्या वाहनांना अंदाज न आल्यास अपघात होऊ शकतो. कमी प्रकाशामुळे इथे सतत अपघात होत असतात. वाहतूक शाखेची चौकी समोरच आहे तरीसुद्धा यावर लक्ष दिले जात नाही. प्रशासनाने या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करावी.
- योगेश अचलारे, भोसरी
E26V81482

विष्णुदेवनगरमध्ये धूळ व कचऱ्याचे साम्राज्य
पुनावळे येथील विष्णुदेवनगर मध्ये धुळीचे साम्राज्य वाढत आहे. शिवाय येथील पदपथावर कचरा वाढला आहे. पदपथावरील झाडेही वाळून गेली आहेत. संबंधित प्रशासनाने या परिसरात लक्ष द्यावे. धुळ आणि घाण यामुळे लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
- कमलाकर कुलकर्णी, पुनावळे
PNE26V81484

शिवराजनगरमध्ये रस्त्यावर कचऱ्याचा त्रास

रहाटणी येथील शिवराजनगर परिसरात साई क्रिस्टल सोसायटी या भागातील रॉयल मॅजेस्टिक सोसायटी समोर दररोज कचरा टाकला जातो. भटक्या श्‍वानांमुळे कचरा रस्त्यावर पसरतो. हा रस्ता रहदारीचा असल्याने नागरिकांना याचा त्रास होतो. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
- बसवराज पाटील, रहाटणी, शिवराजनगर
: PNE26V81483

चेंबर शेजारील खड्डा दुरुस्त करावा
बिजलीनगर येथील विश्वेश्वर मंदिर परिसरातील आर्वीकर निवास समोर असलेले ड्रेनजच्या चेंबर शेजारी खड्डा पडला आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दुरुस्ती न केल्यास चेंबरला भगदाड पडण्याची शक्यता आहे. तरी संबंधितांनी त्वरित दखल घ्यावी. तसेच या भागात ठिक ठिकाणी रस्त्यामधे खड्डे पडलेले आहे.
- राजाभाऊ आर्वीकर, बिजलीनगर
PNE26V81485

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com