पिंपरी-चिंचवड
ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सभासदांचा सन्मान
पिंपरी, ता. २ ः ज्येष्ठ नागरिक मित्रमंडळ चापेकर चौकाच्या वतीने सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शाल व श्रीफळ आणि उपयुक्त मोठी पिशवी भेट देण्यात आली. या वेळी रमेश पाटील, मुळीकर, गुलाबराव बिरदवडे यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारी भाषणे झाली. कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी ३० सभासद उपस्थित होते.

