

पिंपरी, ता. २ : पिंपरी चिंचवड पोलिसांनी डिसेंबरमध्ये दहा गुन्हेगारी टोळीतील ४९ गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमाअंतर्गत (मकोका) कारवाई केली आहे. या गुन्हेगारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईत तब्बल १३८ गुन्हे दाखल असलेल्या दुधानी टोळीचाही समावेश आहे.
पोलिस पथकावर गोळीबाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करीत असताना सनीसिंग दुधानी, जलसिंग दुधानी (दोघेही रा. रामटेकडी हडपसर), मनीष कुशवाह (रा. मध्य प्रदेश) व त्यांचे साथीदार यांच्या टोळीवर एकूण १३८ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळली आहे. तसेच चाकण येथील ओमकार बिसणारे, अतुल तांबे, रामनाथ ऊर्फ टिल्या घोडके, रजत सय्यद, दिनेश दिवे व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा. चाकण) या टोळीवर एकूण चौदा गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर चाकण मेदनकरवाडी परिसरातील किशोर ऊर्फ साईनाथ कुऱ्हाडे, विष्णू ऊर्फ बाळा कुऱ्हाडे, ओमकार टोके, ऋषीकेश सुळ, मट्या (सर्व रा. मेदनकरवाडी, चाकण) या टोळीवर सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
हिंजवडी पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या तपासात अर्शद काझी, आफताब पठाण (दोघेही रा. बारामती), वाजिद कुरेशी (रा. दौंड), अनिकेत चंदनशिवे (रा. कवठे महांकाळ, जि. सांगली) या टोळीवर दहा गंभीर गुन्हे आढळले.
तर चिंचवड येथील गौतम कांबळे, प्रथमेश उर्फ विकी तिपाले, अमय ठाकरे, सुमीत संदनशिव, समर्थ नगरकर (सर्व रा. चिंचवड), अथर्व ऊर्फ चन्याभाई शिंदे (रा. शिवशंभो नगर, कात्रज) या टोळीवर एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
चिखली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान अक्षय जाधव, सौरभ ऊर्फ गोविंद तुपे, निखिल गाडेकर ( सर्व रा. चिखली), कुणाल भंडारी, प्रशांत ऊर्फ परशुराम तुपे (रा. मोईगाव) या टोळीवर एकूण तेरा गंभीर गुन्हे असल्याची नोंद आढळली. यांसह गोविंदसिंग टाक (रा. गुलटेकडी, पुणे), प्रेम रणदिवे (रा. पिंपरी) व त्यांचे साथीदार यांच्या टोळीवर एकूण ११ गंभीर गुन्हे गुन्हे दाखल आहेत. तर, काळेवाडी फाटा परिसरातील किशोर पांचाळ, आशिष ऊर्फ गुऱ्या उपगंडले, स्वप्निल सूर्यवंशी या टोळीवर चार गंभीर गुन्ह्यांची नोंद आढळली.
वाकड पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान प्रफुल्ल ढोकणे, आकाश हेगडे, करण आहेर, आदेश गायकवाड (चौघेही रा. थेरगाव), समाधान बोकेफोडे (रा. ताथवडे), अक्षय नाना शिंदे ऊर्फ सुमीत शिंदे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) या टोळीवर एकूण सहा गंभीर गुन्हे आढळले.
तसेच निगडी, तळवडे परिसरातील सुशिल ऊर्फ बारक्या गोरे, गणेश धनुरे, आदित्य उगले, कार्तिक गुजमल, अरमान देशमुख, वेदांत वाटरकर व तीन अल्पवयीन मुले या टोळीवर एकूण नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या दहा टोळीतील गुन्हेगारांनी स्वतःची संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून पिंपरी चिंचवड, पुणे, पुणे ग्रामीण, सातारा, सांगली, सोलापूर हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.
---