निवारा शेडअभावी
एसटी प्रवाशांची गैरसोय

निवारा शेडअभावी एसटी प्रवाशांची गैरसोय

Published on

सोमाटणे, ता. ३ ः पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे जाण्यासाठी जुना उर्से टोलनाका येथून दररोज शेकडो प्रवासी एसटी बसने प्रवास करत आहेत. प्रवासी संख्या वाढल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाने या ठिकाणी सर्व एसटी बसथांबा देत तिकीट विक्री व बस थांबवण्यासाठी एका वाहकाची नेमणूक केली आहे. मात्र, तेथे निवारा शेड नसल्याने गैरसोय होत आहे.

या वाहकाच्या माध्यमातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या मागणीनुसार एसटी बस थांबवून तिकीट देण्यात येते व प्रवाशांना बसमध्ये बसवले जाते. यापूर्वी येथे प्रवासी आणि वाहकांसाठी स्वतंत्र निवारा शेड उपलब्ध होते. मात्र, अलीकडे उर्से टोलनाक्याचे स्थलांतर झाल्यानंतर प्रवासी निवारा शेड नवीन ठिकाणी हलवण्यात आले, तर पोलिस कर्मचारी चौकीला कुलूप लावून ती कायमची बंद करण्यात आली.

निवारा शेड हलवल्यानंतर या ठिकाणी वाहक व प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था उरलेली नाही. सध्या बस येईपर्यंत वाहकाला भर उन्हात रस्त्यावर खुर्ची टाकून थांबावे लागत आहे. तर प्रवाशांना बंद केबिनच्या पायऱ्यांवर बसून एसटी बसची वाट पाहावी लागत आहे. पावसाळ्यात तर प्रवाशांना छत्री घेऊन उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो.

प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी तातडीने निवारा शेड उभारण्यात यावा, अशी मागणी शेतकरी भूमाता कृती समितीचे अध्यक्ष सुभाष धामणकर यांनी केली आहे. रस्त्याची व्यवस्था पाहणाऱ्या आयआरबी कंपनीने बंद असलेली केबिन व निवारा शेड वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास प्रवासी व वाहकांची अडचण दूर होईल, असे मत उर्से टोलनाका येथील वाहक फुलचंद सोनवा टेकाळे यांनी व्यक्त केले आहे.

उर्से टोलनाका ः निवारा शेड नसल्याने एसटी बस येईपर्यंत उन्हात खुर्ची टाकून बसलेले वाहक व पायऱ्यांवर बसून प्रतीक्षा करणारे प्रवासी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com