सकाळ संवाद
कलाकृतींची देखभाल करा
पिंपरी चिंचवडच्या प्रत्येक मुख्य चौकांत गेल्या दोन वर्षांपूर्वी खूप छान मोठ्या कलाकृती उभ्या केल्या होत्या. परंतु आता त्यावरील रंगसंगती फिकी पडून त्यावर धुळीचे वास्तव्य झाले आहे. काही ठिकाणी त्या खराब झाल्या आहेत. त्यावर पुन्हा रंग लाऊन त्या पूर्ववत कराव्यात. त्या नियमित स्वच्छ राहतील, असे नियोजन करावे. आपले शहर सुंदर दिसेल याकडे पालिकेने लक्ष द्यावे.
- नितीन नागुल, संभाजीनगर
PNE26V82177
बेकायदा पार्किंग हटवा
पीजी होस्टेलमधील लोक योग्य पद्धतीने पार्किंगची व्यवस्था न करता दुचाकी लावत आहेत. त्यामुळे रस्त्यांवर आणि इतरांच्या घरांपुढे दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. घर मालकांसाठी त्याने पार्किंगची अडचण निर्माण होते. यामुळे दैनंदिन अनावश्यक वाद निर्माण होतात आणि खऱ्या मालकांच्या वाहनांचे नुकसान होते. स्थानिक प्रशासनाचे तत्काळ हस्तक्षेप आवश्यक आहे.
- बक्तावर शेख
PNE26V82179
अतिक्रमणंविरोधात कारवाई हवी
स्थानिकांनी कर भरा व परप्रांतीयांनी येऊन मोफत व्यवसाय करा. अतिक्रमण निर्मूलन विभाग कधी जागा होणार ? दररोज संध्याकाळी पिंपळे गुरव येथील तुळजाभवानी मंदिराच्या समोरील पदपथावर परप्रांतीय आपला व्यवसाय मांडून बसतात. संपूर्ण पदपथ अडवून ठेवतात. त्यामुळे नागरिकांना पदपथावर चालणे अशक्य होते. हे सामान पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वेडीवाकडी वाहने लावल्याने वाहतुकीस अडचण होते. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संध्याकाळी देखील कारवाई केली, तर या गोष्टींवर नियंत्रण राहील.
- नितीन सोनवणे, पिंपळे गुरव
PNE26V82178
बेवारस वाहन हलवा
पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाकडून कासारवाडीकडे जाणाऱ्या पुलावर काही महिन्यांपासून एक चारचाकी वाहन बेवारस स्थितीत उभे आहे. त्याच्यावर धूळ, माती मोठ्या प्रमाणावर साचलेली आहे. या पुलावर व पुढे असलेल्या सृष्टी चौकात या वाहनामुळे वाहतूक कोंडी होत आहे. तरी हे बेवारस वाहन तातडीने स्थलांतरित करुन वाहनचालकांना दिलासा द्यावा.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
PNE26V82176
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

