इवल्याच्या डोळ्यांत भरारीचे स्वप्न पेरून दिलेस तू...

इवल्याच्या डोळ्यांत भरारीचे स्वप्न पेरून दिलेस तू...

Published on

पिंपरी, ता.३ ः उंबरठ्यापासून आकाशापर्यंतची... आमची सफर सोपी केलीस तू... ज्योतिबांच्या आधाराने आणि तुझ्या निर्धाराने भंगलेल्या जुनाट विचारांची चौकट मोडून आकाशाला गवसणी घातलीस जणू ! आमच्या इवल्याच्या डोळ्यांत भरारीचे स्वप्न पेरून दिलेस तू...! अशा शुभेच्छा देत विविध शाळांमध्ये स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. तसेच त्यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित ओव्या, गीते, कविता, भाषणे सादर केली. तर विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या वेशभूषा करून एकांकिका सादर केल्या.
चिंचवडमधील मनोरम प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात संस्थेच्या कार्यवाह स्वरा केतकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली तोरडमल यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता पहिली ते पाचवीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बालिका दिनानिमित्ताने विद्यार्थ्यांनी हिंदी पाठाचे नाट्यीकरण सादर केले. तसेच विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंविषयीची ओवी गायली. तसेच सावित्रीबाईंचे विचार मांडले.


कन्या प्रशालेत नाट्यछटा
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत बालिका दिवस अर्थात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली. याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव राजेंद्रकुमार मुथा, सहाय्यक सचिव अनिलकुमार कांकरिया यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. प्राचार्या सारंगा भारती यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी प्रतिमा पूजन व सावित्रीच्या लेकींचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थिनींनी मनोगते व अप्रतिम नाट्यछटा सादर केल्या. प्रशालेच्या सहशिक्षिका संध्याराणी धुमाळ यांनी सावित्रीबाईंचा जीवनपट विद्यार्थिनींसमोर मांडला. पर्यवेक्षक शशिकांत हुले व शिक्षक प्रतिनिधी विजयाराणी गडचे यांनी संयोजन केले. श्वेता देव यांनी सूत्रसंचालन केले, तर उपमुख्याध्यापिका सुषमा बंब यांनी आभार मानले.

गीता मंदिरात चारोळ्या, ओव्या
गीतामंदिर प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भाषणे, चारोळ्या, ओव्या सादर केल्या. ‘मी सावित्रीबाई’ या एकपात्री प्रयोगातून त्यांना अभिवादन केले. उपशिक्षिका अपर्णा संकपाळ यांनी आयोजन केले. विद्यार्थिनी कल्याणी लोंढे हिने सूत्रसंचालन केले.

‘ती लढली म्हणून आम्ही घडलो’
आचार्य श्री आनंद ऋषीजी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त बालिका दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी ‘ती लढली म्हणून आम्ही घडलो’ या नाट्यछटेद्वारे सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे मानद सचिव राजेंद्र मुथा, संस्थेचे प्राध्यापक अनिल कांकरिया, शाळेच्या प्राचार्य सीमा लिंभोरे उपस्थित होते.


विद्यार्थिनींकडून सावित्रीबाईंची वेशभूषा
श्री गुरु गणेश विद्यामंदिर माध्यमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंती साजरी केली. विद्यालयाचे प्राचार्य हनुमंत मारकड यांनी मार्गदर्शन केले. सई काटे, वैष्णवी पुजारी, रिया मोहोळकर या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली. अक्षरा साखरे, प्राप्ती कसबे, पूनम अडसूळ आदी विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. पर्यवेक्षक हितेंद्र लोखंडे यांनी सावित्रीबाईंनी विविध क्षेत्रांत केलेल्या कामाची माहिती दिली. धनश्री कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष सुरवसे यांनी आभार मानले.

जीवनकार्यावर प्रकाश
चिंचवड येथील कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती उज्वला चौधरी यांनी प्रतिमेचे पूजन केले. त्यांनी प्रास्ताविकेमध्ये सावित्रीबाई फुले यांचे कार्यावर प्रकाश टाकला. सावित्रीबाईंनी समाजासाठी केलेल्या योगदानाची शिक्षकांनी माहिती आपल्या भाषणातून दिली. अस्लम अली शेख यांनी सूत्रसंचालन केले.
PNE26V82298

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com