नागरी समस्या

नागरी समस्या

Published on

सकाळ संवाद
पिंपळे गुरव येथील प्रा. रामकृष्ण मंगल कार्यालयामागील गारवे रेसिडेन्सीसमोर मोकळ्या जागेत असंख्य नागरिक येता-जाता कचरा फेकतात. महानगरपालिकेची घंटागाडी दररोज येत नसल्याने तेथे स्थायिक नागरिकांना दुर्गंधी व डासांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या प्रश्नात नगरसेवक किंवा प्रशासनाचे लक्ष नाही. तरी तेथील कचरा दररोज उचलला गेला पाहिजे, अशी इतर नागरिकांची मागणी आहे.
- प्रमिता सोनवणे, पिंपळे गुरव

E26W02669

हिंजवडी फेज ३ याठिकाणी चेंबर तुटले आहे. दीड महिन्यांपासून दुरुस्त झालेली नाही. रात्रीच्यावेळी चेंबरमध्ये पडून कोणत्याही प्रवाशाचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे ताबडतोब दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
- गोरख चौधरी, हिंजवडी
NE26W02672


पदपथावरील चेंबर दुरुस्त करावे
प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहाच्या शेजार प्रेम सागर अपार्टमेंटच्या जवळ असलेल्या पदपथावरील चेंबर तुटले आहे. या भागात रात्री दिवे नसतात. या अपार्टमेंटच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी हाच एक रस्ता असल्याने लोक इथूनच प्रवास करतात. कुणी चुकून तेथून गेला तर पडून त्याचा पाय तुटू शकतो. त्यामुळे हे धोकादायक चेंबर त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे.
- सलीम सय्यद, चिंचवड

PNE26W02672

मिलिंद नगर पुनर्वसन प्रकल्प प्रभाग क्रमांक - २१ मधील सुभेदार रामजी आंबेडकर वसाहतीमधील पिंपळाचे झाड धोकादायक वाढले आहे. महानगरपालिकडे तक्रार करूनही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे.
- परमेश्वर गायकवाड, मिलिंद नगर

PNE26W02671

सांडपाणी साचल्याने धोका
थेरगाव येथील तुळजाई कॉलनी क्रमांक १ लाइन संचेती शाळेजवळ सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर सांडपाणी व कचरा साचत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सिमेंट रस्ता करताना उतार काढला गेला नाही. हे काम चुकीच्या पद्धतीने करण्यात आले. परिणामी पावसाचे पाणी व सांडपाणी रस्त्यावरच साचत आहे. त्यात पालिकेची नियमित साफसफाई होत नसल्याने माती, दगड, कचऱ्याची भर पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. पालिकेने लवकरात लवकर या समस्येचे निराकरण करावे.
-किसन फसके, थेरगाव
PNE26W02670

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com