

पिंपरी, ता. ११ : पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार गेल्या सहा महिन्यांपासून प्रभारी आयुक्तांकडून सुरू होता. दरम्यान, महापालिका निवडणूक झाली. मात्र, पूर्णवेळ आयुक्त मिळाले नव्हते. त्यामुळे नवीन आयुक्त कोण असणार? याची उत्सुकता होती. अखेर राज्य सरकारने डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केल्याचा आदेश बुधवारी (ता. ११) काढला आणि नवीन आयुक्त महापालिकेला मिळाले.
लोकनियुक्त प्रतिनिधींची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली. तेव्हापासून आयुक्तांकडे प्रशासक म्हणून जबाबदारी होती. या कालावधीत राजेश पाटील आणि शेखर सिंह यांनी पूर्णवेळ काम पाहिले. मात्र, शेखर सिंह यांची सात ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली झाली. तेव्हापासून पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्त व प्रशासकपदाची अतिरिक्त जबाबदारी होती. त्यांच्याच नियंत्रणाखाली डिसेंबर २०२५ व जानेवारी २०२६ मध्ये महापालिका निवडणूक झाली. अखेर सहा फेब्रुवारी २०२६ रोजी लोकनियुक्ती प्रतिनिधींनी सत्ता स्थापन केली आणि प्रशासकीय कारकीर्द संपली. परंतु, पूर्णवेळ आयुक्त मिळाले नव्हते. हर्डीकर यांच्याकडेच अतिरिक्त पदभार होता. त्यामुळे महापालिकेला नवीन आयुक्त कोण मिळणार? याची उत्सुकता होती. अखेर ती संपली.
अखेर राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी केली. त्याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभाग सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी काढला. ‘‘आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार महसूल विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारावा,’’ असे या आदेशात म्हटले आहे.
PNE26W02906
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.