

आरोग्य दिनानिमित्त जनजागृती
- मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी, मोशी
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मोशीतील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने फार्म.डी.च्या विद्यार्थ्यांनी जागतिक आरोग्य दिन साजरा केला. मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणाचे विज्ञानदृष्ट्या संरक्षण करण्यावर जागृतीतून भर दिला. प्रा. सारिका आल्हाट, आरोग्य सेविका सीमा रोकडे यांनी संयोजन केले. प्राचार्य डॉ. एस. एन. ढोले, डॉ. राहुल चनशेट्टी, डॉ. नीलेश कुलकर्णी, डॉ. रामनाथ बच्छाव, अनुपम वेले यांनी मार्गदर्शन केले.
कृषी व्यवस्थापन मार्गदर्शन
(डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय)
आकुर्डीतील डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात ‘प्लेसमेंट व कॉर्पोरेट रिलेशन्स सेल’ अंतर्गत ‘कृषी व्यवसाय व्यवस्थापनात परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी व जागतिक करिअरच्या वाटा’ यावर रिना तिवारी यांनी मार्गदर्शन केले. एज्युअलायन्स एज्युकेशनल कन्सल्टंट्स, ‘सकाळ’चे ‘यिन’ नेटवर्क यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अथुराई बालाजी यांनी केले. राजवर्धन करांडे यांनी आभार मानले. प्रा. दिग्विजय पवार यांनी संयोजन केले.
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
(अजिंक्य डी.वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, चऱ्होली- लोहगाव येथील अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि रेड प्लस ब्लड बँक यांच्यातर्फे आरोग्य सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर झाले. त्यात २७० जणांनी सहभाग घेतला. कुलगुरू डॉ. राकेशकुमार जैन, प्राचार्य डॉ. फारुक सय्यद यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना डॉ. शितल सोलंकी, प्रा. दिलीप घुले यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.