सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

फुलजाई चौकातील समस्या सोडवा
फुलजाई चौकात पाईपलाईन रोडवर नेहमीच गणपती मंदिराजवळ प्रचंड कचरा अधूनमधून पदपथावर वाहनांची पार्किंग, वाहणारे मैलायुक्त दुर्गंधीत पाणी, गंजलेली ड्रेनेज जाळी आढळते. इथे ३०७ नंबरच्या बसचा बसस्टॉप आहे. तिथे नाक दाबून उभे राहावे लागते. ही समस्या कधी सुटणार?
- श्रीनिवास धोंगडे, शिंदे वस्ती, रावेत

अतिक्रमणांकडे लक्ष द्या
तळेगाव दाभाडेमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण आणि डांबरीकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवनियुक्त मुख्याधिकारी याकडे जातीने लक्ष देऊन शहर सुधारणा करण्यासाठी आग्रही आहेत. नवीन कारभारी नव्या जोमाने कामाला लागले आहेत. ही खूप समाधान देणारी बाब आहे. शहर विकसित, सुंदर आणि स्मार्ट करण्यासाठी त्यांना थोडा वेळही द्यावा लागेल. परंतु अनेक ठिकाणी अनधिकृत बॅनर, खासगी पार्किंग, विविध वस्तूंची विक्री करणारे विक्रेते आणि भोंगे लावून विक्री करणाऱ्या अनेक विक्रेत्यांनी अतिक्रमण करून हे रस्ते काबीज केले आहेत. त्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. काही शासकीय, सार्वजनिक आणि आरक्षित जागांवर दिवसाढवळ्या होणारी अतिक्रमणे आणि बांधकामे याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे.
- प्रकाश दातार, तळेगाव दाभाडे

एसटी बस इतरत्र वळवा
निगडी भूमिगत मार्ग येथील बसथांब्यावर जिथे एसटी बसद्वारे प्रवाशांना उतरवले जाते. प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात एक गंभीर बाब आपल्या निदर्शनास आणून देत आहे. आधीच एसटी प्रशासनाकडे उचलून धरलेलाआहे. तथापि अद्याप प्रत्यक्षात कोणतीही सुधारणा झालेली दिसून येत नाही. या ठिकाणी प्रवाशांसाठी योग्य पादचारी बाहेर पडण्याचा मार्ग किंवा सुरक्षित रस्ता ओलांडण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. तुटलेल्या बॅरिकेड्समुळे तसेच नियोजित क्रॉसिंग नसल्यामुळे प्रवाशांना भरधाव वाहतुकीच्या रस्त्यावरून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत आहे. रात्रीच्यावेळी व गर्दीच्या वेळेत ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरते. जोपर्यंत योग्य पादचारी मार्ग किंवा सुरक्षित क्रॉसिंगची व्यवस्था केली जात नाही. तोपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने एसटी बस भूमिगत मार्गाऐवजी नेहमीच्या रस्त्यावरून वळविण्यात याव्यात.
- एक वाचक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com