भाजपचा शाश्वत विकासाचा ‘संकल्प’

भाजपचा शाश्वत विकासाचा ‘संकल्प’

Published on

पिंपरी, ता. ११ ः ‘पिंपरी चिंचवड शहराचा संकल्प शाश्वत विकासाचा’ अशा घोषवाक्यासह भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जाहीरनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आकुर्डीतील सभेत प्रकाशित करण्यात आला. भारतीय जनता पक्षाचा हा जाहीरनामा केवळ निवडणुकीसाठी दिलेल्या आश्वासनांचा संच नसून सुशासन, तंत्रज्ञान, पर्यावरणीय संतुलन आणि नागरिक केंद्रित प्रशासनाचा रोडमॅप असल्याचे त्यात म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड शहरासमोरील आव्हाने सोडविण्याचा संकल्प जाहीरनाम्यात केला आहे. मेट्रो मार्गाचा विस्तार केला जाईल. यात निगडी-वाकड-चाकण मार्गाला मंजुरी मिळवून काम सुरू केले जाईल. तसेच, निगडी ते वाघोली व्हाया चिखली, मोशी, चऱ्होली; निगडी ते चाकण व्हाया तळवडे; पुणे विमानतळ ते आळंदी व्हाया दिघी, चऱ्होली; हिंजवडी फेज ३ ते चिखली व्हाया डांगे चौक, पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशन; पुणे विद्यापीठ ते देहूरोड व्हाया औंध, सांगवी, डांगे चौक, रावेत; नाशिक फाटा- भोसरी- चाकण अशा नवीन मेट्रो मार्गाचा विस्तृत डीपीआर केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

असे आहे संकल्पपत्र
एक शहर, एक मतदारसंघ ः २०३२ पर्यंत पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र लोकसभा मतदारसंघाची मागणी, विधानसभा मतदारसंघाच्या सीमांची पुनर्रचना करून शहराच्या विकासाला राष्ट्रीय स्तरावर प्राधान्य मिळवून देऊ
स्वतंत्र ‘शिवनेरी’ जिल्हा व सरकारी कार्यालयाचे विकेंद्रीकरण ः स्वतंत्र ‘शिवनेरी’ जिल्ह्याची निर्मिती करू, एमआयडीसी, महावितरण आणि टपाल विभागाची स्वतंत्र स्थानिक मुख्य कार्यालये शहरात स्थापन करून शहरातील सहा हजाराहून अधिक गृहनिर्माण संस्थांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र निबंधक कार्यालयाची मागणी करू.

एकात्मिक प्रशासकीय केंद्र ः प्रत्येक प्रभागात एक ‘वन-स्टॉप शॉप'' (एकात्मिक केंद्र) सुरू करू, जिथे महापालिका, राज्य व केंद्र सरकारच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळतील. पिंपरी किंवा मोशी येथे एकात्मिक प्रशासकीय क्लस्टर उभारले जाईल

कल्याणकारी योजनांसाठी विशेष टास्क फोर्स ः महापालिका निगडित सेवा ‘सारथी’ हेल्पलाईनशी जोडून डिजिटल डॅशबोर्डवर रिअल टाइममध्ये पाहता येईल.

स्मार्ट सिटी प्रशासन ः स्मार्ट सिटी मिशन किंवा शहर परिवर्तन कार्यालयाच्या माध्यमातून तंत्रज्ञानांची जोड देऊन नवनवीन उपक्रम सुरू ठेवले जातील. तरुणांना सरकारी कामात रोजगाराच्या नवीन संधी दिल्या जातील.
नागरिकांचा अर्थसंकल्पात सहभाग ः शहराची सर्व धोरणे आणि बजेटची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देऊ, कराचा पैसा कुठे खर्च होतोय हे पाहता येईल.

स्मार्ट फॅमिली ॲप ः ‘स्मार्ट फॅमिली ॲप’ सुरू करू, जे कचरा वर्गीकरण, सौर ऊर्जा वापर आणि वाहतूक शिस्त पाळणाऱ्या कुटुंबांना प्रोत्साहित करेल. चांगले गुण मिळवणाऱ्या कुटुंबांना मालमत्ता करात सवलत आणि विशेष सन्मान, बक्षिसे दिली जातील.

--

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com