शालेय जगत

शालेय जगत

Published on

शालेय जगत

श्री सयाजीनाथ महाराज विद्यालय
वडमुखवाडीतील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी झाली. प्राचार्य राजकुमार गायकवाड यांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. मुख्याध्यापक नीलम नाईक, संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार रामभाऊ मोझे, संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मोझे, संस्थेच्या सदस्या प्रा. अलका पाटील यावेळी उपस्थित होते. इयत्ता नववीतील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी घाटुळे हिने राजमाता जिजाऊ यांच्यासारखी वेशभूषा केली. सहशिक्षक शिरीष कुमार सूर्यवंशी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याविषयी भाषण केले. क्रीडा शिक्षक संजय जैनक यांनी आभार मानले.

एच. ए. स्कूल
एच. ए. स्कूलमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी झाली. यावेळी संत तुकाराम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरख कुंभार यांनी भाषण केले. ज्येष्ठ शिक्षिका सुषमा निरगुडकर यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, ‘‘शिक्षण आणि संस्कार मिळवून विद्यार्थ्यांनी आपले आयुष्य घडवले पाहिजे.’’ शिल्पा राशीनकर यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा निरगुडकर यांनी प्रास्ताविक केले. पर्यवेक्षिका मनीषा कदम यांनी आभार मानले.

मॉडर्न हायस्कूल
निगडीतील यमुनानगरमधील मॉडर्न हायस्कूलमध्ये विज्ञानाची विविध प्रात्यक्षिके सादर झाली. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या उद्देशाने सायन्स पार्कतर्फे शाळेमध्ये असे उपक्रम राबविले जातात. यावेळी सायन्स पार्कचे प्रा. दिनेश काळेल, प्रा. शशिकांत जढाळ, प्रा. राम रानगट, पर्यवेक्षक विजय पाचरणे, राजीव कुटे, उमर शेख, शिवाजी अंबिके, गंगाधर सोनवणे उपस्थित होते. स्मिता कपटकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध प्रयोग प्रात्यक्षिकासह दाखविण्यात आले. मुख्याध्यापिका शारदा साबळे यांनी मार्गदर्शन केले.

मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर
निगडीतील यमुनानगर परिसरातील मॉडर्न प्राथमिक विद्यामंदिर वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी कुंडलिक कारकर उपस्थित होते. शाळा समितीचे अध्यक्ष मानसिंग साळुंके अध्यक्षस्थानी होते. पांडुरंग मराडे यांनी प्रास्ताविक केले. सुजाता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय किरण वारके यांनी करून दिला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ‘संभाजी महाराजांची शौर्यगाथा’ या नृत्याला प्रथम क्रमांक मिळाला. त्यासाठी मार्गदर्शन केलेल्या कैलास माळी यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.

जयवंत प्राथमिक शाळा
भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक शाळेत बाल आनंद बाजार पार पडला. संस्थेचे मार्गदर्शक दिलीप चव्हाण, सेवानिवृत्त बालवाडी शिक्षिका अंजली हुंबे व मुख्याध्यापिका वंदना सावंत यांनी उद्‍घाटन केले. यावेळी बाजारामध्ये भाजीमंडई, खाऊगल्ली व विविध वस्तू विक्री बाजार असे विभाग करण्यात आले. शबाना सय्यद यांनी संयोजन केले. जयश्री मोरे, वंदना कोरपे, बसवेश्वर औरादे, जयश्री ध. मोरे, नीलिमा धामणे, सचिन जाधव, नंदा डांगे, ज्योती गुराळकर, अशोक मुंढे यांनी सहकार्य केले.

सौ. मुथा कन्या प्रशाला
सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद जयंती साजरी झाली. प्राचार्या सारंगा भारती यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी अन्वयी दळवी, श्रुती गाडगे, शर्वरी शेंडगे, अंकिता भवर, आर्या लाले या विद्यार्थिनींनी भाषणे केली. पर्यवेक्षक शशिकांत हुले यांनी जिजाऊंच्या जीवनचरित्राची माहिती दिली. सहशिक्षिका श्वेता देव यांनी विविध गितांमधून जिजाऊंच्या कार्याचा गौरव केला. शिक्षक प्रतिनिधी विजयाराणी गडचे यांनी संयोजन केले. मनिषा लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. उपमुख्याध्यापिका सुषमा बंब यांनी आभार मानले.

विलू पुनावाला शाळा
विलू पुनावाला प्राथमिक शाळेतील ‘स्मार्ट अबॅकस ॲकॅडमी तर्फे

१५ वी राष्ट्रीय आणि ८ वी आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धा झाली. यात यश टिंगरे, स्वरा कुलकर्णी, रुद्राक्षी खाटके, अर्णव माने, प्रेम जोशी, आराध्या चिंचकर, भूमिका जोशी, सम्यक साबळे, शिवराज तडवळ, आरोही शेवळे व रुचिता कुंभार या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले. स्वरा, आराध्या, शिवराज यांनी आपापल्या गटांत ‘फर्स्ट रनर्स अप’चे मानचिन्ह मिळविले आहे. या स्पर्धेत देश विदेशातील सुमारे चार हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अबॅकस शिक्षिका वर्षा साठे कुलकर्णी यांना सलग तिसऱ्या वर्षी ‘उत्कृष्ट फ्रँचाईजी अवॉर्ड’ने गौरविण्यात आले.

सरस्वती विद्यालय
आकुर्डीतील श्री सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झाले. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. गोविंदराव दाभाडे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष ॲड. स्वप्नील पवार, सुनीता पवार, खजिनदार ॲड. अभिषेक दाभाडे, जितेंद्र दाभाडे, माध्यमिकचे प्रभारी प्राचार्य संगीता गुरव, प्राथमिकचे मुख्याध्यापक राजू माळे, श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक एकनाथ आंबले तसेच माध्यमिकचे मुख्याध्यापक हेमंत अभोणकर उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांनी दीपप्रज्वलन व सरस्वती देवीच्या मूर्तीचे पूजन केले. शिशुवर्ग ते इयत्ता आठवी पर्यंतचे सुमारे ६०० विद्यार्थी स्नेहसंमेलनात सहभागी झाले. डम डम डमरू वाजे, गलतीसे मिस्टेक, मोबाईल थीम, खंडोबा नृत्य, पाटलाचा बैलगाडा, कृष्ण मुरारी, मेरावाला डांस, गोरख कुंभार थीम, कोळीगीत, पन्हाळा प्रसंग, आदिवासी नृत्य, धनगर नृत्य, साउथ इंडियन थीम, गोंधळ गीत, इंग्रजी सॉंग, शिवकन्या, देशभक्तिपर गीत, महाराष्ट्राची लोकधारा इत्यादी विषय तसेच गीतांवर मुलांनी उत्स्फूर्तपणे नृत्य केले. डॉक्टर दाभाडे यांनी सत्यम शिवम सुंदरम, अबीर गुलाल उधळीत, अवघे गर्जे पंढरपूर असे अभंग सादर केले. त्यांना संगीतसाथ प्रकाश कोळप व चेतन ताम्हणकर यांनी दिली. नंदा पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्या रेडकर व विकास आंधळे यांनी निवेदन केले. भारती भोंगाडे यांनी आभार मानले. स्वाती जाधव, सुनीता गित्ते, सविता राठोड, शांत हराळे, सारिका आस्मर, अविनाश आखाडे, जयश्री खामगळ, चंदा दोडे, विनोद गोयर, योगेश पाटील यांनी नियोजन केले.

गोलांडे प्राथमिक विद्यालय
चिंचवडमधील कै. श्रीमती कोंडाबाई गोलांडे प्राथमिक विद्यालयात स्वातंत्र्यजननी माँसाहेब जिजाऊ यांची जयंती तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती झाली. मुख्याध्यापिका उज्वला चौधरी व सेवाज्येष्ठ शिक्षिका लता डेरे यांनी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन केले. असलम अली शेख यांनी सूत्रसंचालन केले. अनेक विद्यार्थिनी राजमाता जिजाऊ यांच्यासारख्या वेशभूषेत आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या थोर व्यक्तींची चरित्रे कविता, चारोळ्या, गीते सादर केली. राष्ट्रीय युवा दिनानिमित्त माहिती देण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने संस्कार व आव्हाने स्वीकारली पाहिजेत असे प्रतिपादन करण्यात आले.

श्री फत्तेचंद जैन विद्यालय
श्री फत्तेचंद जैन विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये हस्ताक्षर सुधार कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस आंतरराष्ट्रीय कलाकार नागराज मल शेट्टी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळेस यांनी हस्ताक्षर सुधार कार्यशाळेस मार्गदर्शन केले. प्राचार्या सुनीता नवले, उपमुख्याध्यापिका मनीषा जैन, पर्यवेक्षक राजेंद्र पितळीया, पर्यवेक्षक संजीव वाखारे, पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी, शिक्षक प्रतिनिधी मीनाक्षी ताम्हाणे यावेळी उपस्थित होते.

एच. ए. स्कूल

एच. ए. माध्यमिक विद्यालयात आयोजित स्नेहसंमेलनातील पारितोषिक वितरण प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी ‘राहतो तो देश, करतो ते काम आणि संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसावर प्रेम करा. हीच सवय एक दिवस जगभर शांतता निर्माण करणार आहे,’ असा संदेश दिला. प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात झाले. त्यावेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक परिषदेचे सदस्य, ज्येष्ठ सनदी लेखापाल विवेक मठकरी अध्यक्षस्थानी होते. त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व सांगताना आपला परिसर प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक व अहवाल सादरीकरण शाळाप्रमुख दर्शना कोरके यांनी केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि पर्यावरणाला वाहिलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष खेमराज रणपिसे, उपशालाप्रमुख आशा माने, पर्यवेक्षिका मनीषा कदम, कार्याध्यक्षा विजया तरटे, उपकार्याध्यक्षा छाया भोकटे आदी उपस्थित होते. जगदीश पवार यांनी सूत्रसंचालन केले. छाया भोकटे यांनी आभार मानले.
---

Marathi News Esakal
www.esakal.com