‘वोट बॅंक’कडे उमेदवारांचे ‘लक्ष्य’ ‘क्रॉस व्होटिंग’चा धोका वाढला; शेवटच्या टप्प्यातील रणनीती
पिंपरी, ता. १३ : प्रचार करताना अनेक नवीन भागांतील जोडण्या लावण्यास असलेल्या अडचणी पाहता उमेदवारांनी आता आपापल्या ‘वोट बॅंक’कडे ‘लक्ष्य’ केंद्रीत केले आहे. त्यानंतर इतर भागांतील मतांसाठी प्रयत्न केला जात आहे. मतदारांकडूनही आपल्या भागातील, आपल्या ओळखीचा कोण उमेदवार ? हे पाहून त्याचे नाव यादीत प्रथम ठेवले आहे. नंतर कोण हक्काने आला तरच विचार चालवला आहे.
चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे होत असलेल्या निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचण्यास उमेदवारांना कमी वेळ मिळाला. त्यामुळे उमेदवारच नव्हे, तर त्याचे कुटुंबीय आणि कार्यकत्यांनी आपापल्या पद्धतीने प्रचार केला. पदयात्रा काढून पत्रके वाटून चिन्ह पोचवण्याचा प्रयत्न केला. पण, प्रभागातील सर्वच भागांत पोहोचण्यास मर्यादा होत्या. तेथील मतदारांसमोर अनेकजण प्रथमच गेल्याने प्रतिसाद पाहून उमेदवारांनी रणनीती शेवटच्या टप्प्यात बदलावी लागली.
आपापला भाग ‘पॅक’ करण्याचा प्रयत्न
काही ठिकाणी मात्र एकाच भागातील जादा उमेदवार झाले आहेत. त्यातही विरोधी पक्षातील उमेदवार आहेत. काही ठिकाणी बंडखोर उमेदवार आहेत. त्यामुळे तेथील मतांची विभागणी होणार आहे. हे लक्षात आल्यानंतर उमेदवारांनी आपला ‘हक्काचा’ भाग कोणता? तेथील १०० टक्के मते मिळविण्यासाठी मोठा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रकार प्रत्येक उमेदवारांनी चालवल्याने त्या-त्या भागात उमेदवार, त्याचे कुटुंबीय, कार्यकर्ते यांच्या चकरा वाढल्या आहेत. मित्रपक्षातील अन्य उमेदवारांनी आपापला भाग ‘पॅक’ करण्याचा प्रयत्न केला. पॅनेलनुसार मतदान झाल्यास सहकारी उमेदवारांना फायदा होणार आहे.
‘‘मला एक मत द्या..’’
मित्रपक्षातील काही ठिकाणच्या उमेदवारांनी प्रचार करताना ‘‘एक मत मला द्या, इतर कुणाला द्यायची ती द्या’’ असे सांगताना दिसत आहेत. त्याचबरोबर मतदारही आपल्या भागातील उमेदवार कोण हे पाहत आहेत. दूरच्या उमेदवारापेक्षा घराजवळ कोण आहे, मग तो पॅनेलमध्ये नसला तरी चालेल असा प्रवाह मतदारांमध्ये दिसून येत आहे. यामुळे ‘क्रॉस व्होटिंग’ होणार, अशी चर्चा आहे. त्याचे प्रमाण किती हे मतमोजणीनंतरच समजेल.
PNE26V85308
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

