औद्योगिक कचरा पेटविल्याणे डोंगरावरी गवत खाक
सोमाटणे, ता. १४ ः कंपन्यांतील टाकाऊ कचरा पेटवल्यामुळे आढले येथील डोंगरावरील वनसंपदा संकटात आली असून वणव्यामुळे डोंगरावरील गवत, झाडे जळून खाक झाले आहेत.
बेबडओहोळ आढले रस्त्यालगत आढले फाटा येथील मोकळ्या जागेत कंपन्यांमधील टाकाऊ कचरा, प्लॅस्टिक पिशव्या, ज्वलनशील प्लॅस्टिकचा टाकाऊ भाग टाकले जातात, त्यामुळे येथे कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. अधिक प्रमाणात कचरा साचल्यानंतर तो पेटवून दिला जातो, हा कचरा पेटवल्याने त्याचा वणवा शेजारील डोंगरापर्यंत गेल्याने येथील गवतासह अनेक लहान झाडे जळून खाक झाले. पवनमावळातील डोंगर परिसरात मोर, विविध प्रजातीचे पक्ष, सरपटणारे प्राणी, दुर्मिळ औषधी वनस्पती यांची
संख्या अधिक प्रमाणात असून या वणव्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. वनविभागाच्या वतीने या परिसरात वणव्यापासून जंगले वाचवण्यासाठी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून येथील कंपन्यांतील कचरा पेटविण्याचा प्रकार सुरुच आहे. पाऊस उघडल्यानंतर उन्हाळ्यातील चार महिने शेतकऱ्यांच्या जनावरांना डोंगरातील गवत उपयोगी पडते.
त्याचा वापर चाऱ्यासाठी होतो, गवत जळाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
PNE26V85509
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

