कारभाऱ्यांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये

कारभाऱ्यांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये

Published on

पिंपरी, ता. १४ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान होणार आहे. त्यासाठी शहरातील दोन हजार ६७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी बुधवारी आपापल्या मतदान केंद्रांवर पोहोचले आहेत. शुक्रवारी (ता. १६) मतमोजणी केली जाणार आहे.
महापालिकेत २०१७ मध्ये निवडून आलेल्या कारभाऱ्यांची मुदत १३ मार्च २०२२ रोजी संपली आहे. मात्र, विविध कारणांमुळे वेळेत निवडणूक होऊ शकली नाही. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार गुरवारी (ता. १५) मतदान होणार आहे. त्यासाठी ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी अपक्षांसह विविध पक्षांचे ६९१ उमेदवार रिंगणात आहेत. दोन जागांवरील दोन उमेदवारांविरोधात कोणीही उमेदवार नाही. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याची घोषणाही मतमोजणीच्या दिवशी केली जाणार आहे.
दरम्यान, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील आठ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय उभारलेल्या मतदान साहित्य वाटप केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सुरू असलेल्या मतदान साहित्य वाटप प्रक्रियेचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची तपासणी करताना साहित्य वितरण वेळेत, सुयोग्य व शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे का, याची खात्री त्यांनी करून घेतली. या पाहणी दरम्यान उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया डांगे, अर्चना तांबे, डॉ. दीप्ती सूर्यवंशी, अर्चना पठारे, हिम्मत खराडे, अनिल पवार, नितीन गवळी, पल्लवी घाटगे, निवडणूक विभागाचे उपआयुक्त सचिन पवार, उपआयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे आणि आठ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी होते.

शुक्रवारी सकाळी १० पासून मतमोजणी
मतमोजणी निश्चित केलेल्या ठिकाणी शुक्रवारी (ता. १६) सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. ईव्हीएम फेरीसाठी स्वतंत्र टेबल असतील. टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मतमोजणीचा प्रत्येक फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय नियोजन केले आहे. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय स्तरावर स्वतंत्र मीडिया सेलची व्यवस्था केली जाणार आहे.

अशी आहे व्यवस्था
मतदान केंद्र ः २०६७
मनुष्यबळ ः १०,३३५
मतदान यंत्र ः ७,१४९
कंट्रोल युनिट ः २,९००
वाहने ः ५२१
संवेदनशील केंद्र ः ४८८

केंद्रनिहाय व्यवस्था
एका केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ शिपाई

असे आहेत मतदार
एकूण मतदार ः १७,१३,८९१
पुरुष ः ९,०५,७२८
महिला ः ८,०७,९६६
तृतीयपंथी ः १९७

महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. मतदारांनी आपला संवैधानिक हक्क बजावण्यासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करावे. इतर पात्र मतदारांना मताधिकार बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, महापालिका
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com