

मतदान तयारी जोड
--
मतदान केंद्रांवर पथके
मतदारांना शांततेत, निर्भय आणि सुरळीत वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक यंत्रणेकडून व्यापक आणि चोख तयारी केली आहे. मतदान करताना मतदारांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेऊन सर्व मतदान केंद्रांवर व्यवस्था केली आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाकडून मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांची पथके मतदान केंद्रावर नेमली आहेत.
मतदान केंद्रांवर विविध सुविधा
प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा देण्यासाठी डॉक्टरांसह वैद्यकीय पथक नियुक्ती केले आहेत. पिण्याचे पाणी, व्हिलचेअर व्यवस्था, प्रतिक्षा कक्ष, प्रथमोपचार पेटीसह इतर सुविधा दिल्या आहेत.
वेब कास्टिंगद्वारे केंद्रांवर लक्ष
मतदानाच्या दिवशी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदान केंद्रे वेब कास्टिंगद्वारे जोडली आहेत. तसेच, संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून तत्काळ समन्वय करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारला आहे. समन्वयासाठी समन्वय अधिकारी नियुक्ती केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिली आहे, असे महापालिका निवडणूक विभागाचे उपायुक्त अनिल पवार यांनी सांगितले.
मोबाईल नेण्यास मनाई
मतदाराला मतदान केंद्र, मतदार यादीतील आणि इतर आवश्यक माहिती देण्यासाठी स्लिपा महत्त्वाच्या आहेत. बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या सहाय्याने घरोघरी जाऊन स्लिपांचे वाटप केले आहे. याशिवाय स्लिप वाटताना मतदान केद्रांमध्ये मोबाईल घेऊन जाण्यास मनाई आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयनिहाय सर्व मतदान केंद्रावर स्वयंसेवक नेमले आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांचे मोबाईल ठेवण्यासाठी मैथिली व अंगणवाडी सेविकांची नियुक्ती केली आहे.
मतदारांसाठी मदत कक्ष
शहरातील सर्व प्रभागांमध्ये मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांची योग्य रचना केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक मनुष्यबळ, मतदान यंत्रणा (ईव्हीएम), मतदार यादी, मार्गदर्शनासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. मतदान केंद्रांवरील गोंधळ टाळण्यासाठी रांग व्यवस्थापन, दिशादर्शक फलक आणि मदत कक्षांची व्यवस्था केली आहे.
पोलिसांची तयारी
- भयमुक्त व निकोप वातावरणात मतदान प्रक्रियेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज
- नागरिकांनी कायदा- सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे
- प्रत्येक मतदान केंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त
- विविध पथकांद्वारे पोलिसांचे बारकाईने लक्ष
- बंदोबस्तासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध
- मतदान केंद्रांसह इतर ठिकाणी कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षता
दृष्टिक्षेपात मतदान केंद्र
सर्वाधिक मतदारांचा प्रभाग क्रमांक १६ रावेत-किवळे ः ७५,१०५
सर्वात कमी मतदारांचा प्रभाग क्रमांक २३ थेरगाव ः ३३,०३३
तात्पुरते मतदान केंद्र ः ३२२
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.