मतमोजणीसाठी १५९ टेबलची व्यवस्था
पिंपरी, ता. १५ ः पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान झाले. शुक्रवारी (ता. १६) सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. त्याचा सविस्तर आराखडा निवडणूक विभागाने तयार केला आहे. त्यामध्ये टपाली मतमोजणीसाठी ३२ व मतदान केंद्रनिहाय मतमोजणीसाठी १२७ अशा १५९ टेबलांची व्यवस्था केली आहे. तसेच, मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश असल्याचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
महापालिका निवडणूक मतमोजणी आराखड्यानुसार मतमोजणी केंद्रांची रचना, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा तपशील निश्चित केला आहे. मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस विभागाशी समन्वय साधला असून, आवश्यक बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, पर्यवेक्षक, सहाय्यक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था, ओळखपत्र तपासणी व माहिती कक्ष उभारलेला आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, पार्किंग व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारला आहे. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर केला जाणार आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडावी. नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही हर्डीकर यांनी सांगितले.
अशी आहे मतमोजणी व्यवस्था
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ६९१ उमेदवार रिंगणात आहेत. प्रभागनिहाय मतमोजणीची व्यवस्था आठ ठिकाणी केली आहे. एका ठिकाणी चार प्रभागांतील मतांची मोजणी होणार आहे. शिवाय, टपाली मतदान मोजण्यासाठी स्वतंत्र टेबलची व्यवस्था केलेली आहे. ३२ प्रभागांतील मतांसाठी १२७ टेबलची व्यवस्था असून टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक प्रभागासाठी एक प्रमाणे ३२ टेबलची व्यवस्था केली आहे.
प्रभागनिहाय मतमोजणी व्यवस्था
प्रभाग / मतदान केंद्र / एकूण फेऱ्या
१ / ८१ / १७
२ / ८२ / २१
३ / ८७ / १८
४ / ६२ / १६
५ / ५२ / १६
६ / ५० / १७
७ / ४७ / १६
८ / ५९ / २०
९ / ६९ / १८
१० / ६६ / १७
११ / ७९ / १६
१२ / ५३ / १४
१३ / ५८ / १५
१४ / ७० / १८
१५ / ६० / १५
१६ / ९७ / १४
१७ / ६४ / १६
१८ / ६३ / १६
१९ / ७२ / १८
२० / ५९ / २०
२१ / ६८ / १७
२२ / ६८ / १४
२३ / ३९ / १०
२४ / ५३ / १४
२५ / ७८ / २०
२६ / ८१ / २१
२७ / ६१ / १६
२८ / ६१ / २१
२९ / ६० / २०
३० / ६३ / १६
३१ / ५६ / १९
३२ / ४९ / १७
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

