मतदारांचा उत्साह सायंकाळपर्यंत कायम

मतदारांचा उत्साह सायंकाळपर्यंत कायम

Published on

‘ई’ क्षेत्रीय कार्यालय

चिखली, ता. १५ : महापालिका ई क्षेत्रीय कार्यालयांंतर्गत प्रभाग तीन, चार, पाच आणि सात यांचा समावेश होता. यामध्ये चऱ्होली, मोशी, डुडुळगाव, दिघी, बोपखेल, भोसरी या गावांचा समावेश होतो. या प्रभागांमध्ये उत्साहात मतदान पार पडले. नागरिकांनी सकाळपासूनच मतदानासाठी रांगेत उभे राहून आपला मतदानाचा हक्क बजावला.
भोसरी गावठाण परिसरातील महापालिका शाळेत सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. दुपारीही मतदारांचा उत्साह कायम होता. दिघी येथील महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज शाळेतील खोली नंबर ४४ मध्ये ‘घड्याळ’ चिन्ह समोरील बटन दबले जात नसल्याची तक्रार मतदारांनी केली होती. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी मशीनची पाहणी करून ते सुरळीत सुरू असल्याचे सांगितले.
प्रभाग क्रमांक तीनमधील मोशी-चऱ्होली-वडमुखवाडी या परिसरांत त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाच गवळीनगर, महादेवनगर, सँडविक कॉलनी परिसर आणि प्रभाग क्रमांक सात भोसरी गावठाण परिसरात शांततेत आणि मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. मशिनवरील चिन्हे आणि नाव अस्पष्ट दिसत असल्याची तक्रार काही मतदारांनी केली. तर, मशिनवरील उमेदवाराच्या नावासमोरील चित्र आणि उमेदवाराचे नाव चमकत असल्याने ते लगेच सापडत नव्हते, अशीही तक्रार काही जणांनी केली. त्यामुळे मतदाराचे नाव आणि चिन्ह शोधताना ज्येष्ठ नागरिक आणि निरक्षर मतदारांना अडचणी येत होत्या. त्यामुळे मतदान करण्यासाठी उशीर लागत असल्याची तक्रार अश्विनी काळे यांच्यासह भोसरी गावठाण येथील अनेक मतदारांनी केली. प्रभाग तीनमध्ये माजी महापौर, प्रभाग चारमध्ये माजी उपमहापौर राहायला आहेत. त्यांच्यासह भोसरीच्या आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठळक मुद्दे
- मतदानासाठी मतदार उत्साहात घराबाहेर
- रस्त्यांवर गर्दी, मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा.
- ‘लक्ष्मी दर्शना’ची मतदारांकडून प्रतीक्षा होत असल्याची मोशी, चऱ्होली, वडमुखवाडी परिसरात चर्चा

PNE26V86083

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com