कार्यकर्त्यांचा ढोल-ताशा, हलगीवर जल्लोष !

कार्यकर्त्यांचा ढोल-ताशा, हलगीवर जल्लोष !

Published on

ई क्षेत्रीय कार्यालय

चिखली, ता.१६ : भोसरी येथे तीन, चार, पाच आणि सात या प्रभागांचे फेरीनिहाय निकाल जसजसे जाहीर होऊ लागले. तसतसे ढोल, ताशे आणि हलगीच्या तालावर कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. उमेदवाराची मताधिक्य कमी अधिक होत होते. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांचा उत्साहही कमी अधिक होत होता.
भोसरीतील कबड्डी प्रशिक्षण संकुल येथे सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरू करण्यात आली. याठिकाणी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला. उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक कर्मचारी, अधिकारी यांसह प्रत्येक व्यक्तीचे ओळखपत्र पाहूनच मतमोजणी केंद्रात सोडले जात होते.
प्रभाग क्रमांक सातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे विराज लांडे आणि भाजपचे उमेदवार संतोष लोंढे यांची लढत लक्षवेधक राहिली. या लढतीकडे कार्यकर्ते आणि समर्थकांचे लक्ष लागले होते. सुरुवातीला विराज लांडे हे संतोष लोंढे यांच्या तुलनेत पिछाडीवर होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात त्यांनी मताधिक्य घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मताधिक्य मिळत असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. परिसरात तरुण कार्यकर्त्यांसह महिला आणि समर्थकांनी मोठी गर्दी करून जल्लोष करण्यास सुरुवात केली.

निकाल लांबले
दुपारी काही कर्मचारी जेवण्यासाठी बाहेर पडल्याने काही काळ मतमोजणी थंडावली. त्यामुळे बाहेरील कार्यकर्त्यांना ताटकळत थांबावे लागले. प्रभाग क्रमांक पाचमधील भीमाबाई फुगे आणि प्रभाग क्रमांक सातमधील विराज लांडे वगळता भारतीय जनता पक्षाचे सर्वच म्हणजे १४ उमेदवार निवडून आल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com