मीम्‍स, व्‍हिडिओ शेअर करत रंगले ‘सोशल वॉर’

मीम्‍स, व्‍हिडिओ शेअर करत रंगले ‘सोशल वॉर’

Published on

पिंपरी, ता. १६ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष प्रचारासोबतच सोशल मीडियावरही राजकीय संघर्ष रंगताना दिसला. मतदानापूर्वी आणि निकालानंतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या मीम्स, फोटो आणि व्हिडिओंचा अक्षरशः मारा करण्यात आला. त्यामुळे निवडणुकीनंतर शहरात ‘सोशल मीडिया वॉर’ची चर्चा रंगली आहे.

निवडणूक प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींवर टीका करणारे मीम्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. ‘एआय’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या फोटो आणि ग्राफिक्समधून भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप, अर्धवट राहिलेली विकासकामे, रखडलेले प्रकल्प अशा मुद्द्यांवरून टीका करण्यात आली होती. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवर हे मीम्स मोठ्या प्रमाणावर शेअर होत होते. यामुळे प्रत्यक्ष प्रचारासोबतच डिजिटल माध्यमातूनही वातावरण तापले होते.

दरम्यान, निवडणूक निकालानंतर चित्र बदलले. भाजपला महापालिकेत भरघोस यश मिळाल्यानंतर भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘सोशल मीडिया’वर जोरदार प्रतिहल्ला चढवला. पक्षाच्या नेतृत्वाकडून ‘शड्डू ठोकत’ आव्हान देणारे व्हिडिओ, विजयाचा जल्लोष दाखवणाऱ्या रील्स आणि पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आल्या. काही पोस्टमधून विरोधकांवर अप्रत्यक्ष टोलेही लगावण्यात आले.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतरही सोशल मीडियावरील आरोप-प्रत्यारोप थांबलेले नाहीत. राजकीय चर्चांऐवजी वैयक्तिक टीका, उपरोधिक मीम्स आणि ट्रोलिंगचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी काळात निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष प्रचाराइतकाच सोशल मीडिया प्रचार आणि त्यातून होणारा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये झालेला हा ‘सोशल मीडिया वॉर’ त्याचेच उदाहरण ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com