

पिंपरी, ता.१७ ः महापालिका निवडणुकीत एकूण ६९१ उमेदवारांनी नशीब आजमावले. त्यापैकी विविध पक्षांनी महिलांना ३१४ उमेदवारी दिली होती. यापैकी तब्बल ६४ महिलांना पिंपरी चिंचवडकरांनी विजयी करत महापालिकेचे कारभारी केले आहे. एकूण नगरसेवकांची संख्या १२८ आहे. महिला आरक्षणामुळे त्याच्या निम्मी संख्या ६४ ही महिलांसाठी राखीव आहे. विशेष म्हणजे भाजपने मिळविलेल्या एकूण ८४ जागांपैकी तब्बल ४२ महिलांना पिंपरी चिंचवडकरांनी निवडून दिले आहे, हे विशेष. खालोखाल राष्ट्रवादीच्या १८, शिंदे सेनेच्या ३ आणि अपक्ष एक महिला निवडून आल्या आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रिंगणात विविध राजकीय पक्षांच्या तब्बल ३१४ महिला उतरल्या होत्या. सर्वाधिक जागा लढणाऱ्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक महिलांना संधी दिली. ६१ जणी अपक्ष म्हणून नशीब आजमावत होत्या. प्रभागांतील आरक्षणे जाहीर झाल्यानंतर आपापल्या सोईनुसार प्रभाग व जागा निश्चित करून इच्छुकांनी काही निर्णय बदलले. काही ठिकाणी पुरुषांऐवजी घरातील महिलांना संधी दिली. काही माजी नगरसेविकांसह अन्य महिलांनीही खुल्या जागांतून निवडणूक लढविली. विविध उपक्रमांसह मतदारांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी ठरला.
भाजपकडून सर्वाधिक महिला
यंदा भाजपने सर्वाधिक महिलांना उमेदवारी देत इतिहास घडविला. तब्बल १२८ जागांपैकी ६२ जागांवर महिलांना उमेदवारी देण्यात आली असून हा आकडा इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. मात्र, त्यांच्या तीन उमेदवारांचे एबी फॉर्म उशिरा पोहोचल्याने त्यांच्यावर अपक्ष लढण्याची वेळ आली. त्यामध्ये दोन महिला उमेदवारांचा समावेश होता. याशिवाय, एका महिलेला खुल्या जागेवर संधी दिली. त्यामुळे अपक्ष पुरस्कृत दोन महिलांसह भाजपने ६२ जागांवर महिला उमेदवारांना संधी दिली होती. विशेष म्हणजे केवळ महिला आरक्षित वार्डांपुरते न थांबता, सर्वसाधारण गटामध्येही भाजपने महिलांवर विश्वास दाखवत त्यांना संधी दिली. या महिला उमेदवारांनी विविध सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक पातळीवर काम केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला. त्यामुळे या महिलांकडून निवडणुकीत दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात होती.
पक्षनिहाय निवडून आलेल्या महिला
भाजप - ४२
राष्ट्रवादी - १८
शिंदे सेना - ३
अपक्ष - १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.