‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’मुळे 
शहर, परिसरातील वाहतुकीत बदल

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’मुळे शहर, परिसरातील वाहतुकीत बदल

Published on

पिंपरी, ता. १८ : पुणे जिल्हा प्रशासन, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, आशियाई सायकलिंग महासंघ व आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघ यांच्यावतीने पुण्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील मार्ग हा पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण हद्दीतून जात असल्याने पिंपरी चिंचवड हद्दीतील स्पर्धा मार्गावर येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून, ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. हा बदल मंगळवारी (ता. २०) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेसाठी असेल.

वाहतूक बदल पुढीलप्रमाणे :
बंद असणारे मार्ग व कंसात पर्यायी मार्ग
- हिंजवडी वाहतूक विभाग अंतर्गत असलेल्या भोईरवाडी गावाकडून हेलिपॅड सर्कल (हेलिपॅड सर्कलकडे येणारी वाहतूक अंतर्गत रस्त्याने कॅपिटल अॅन्ड सर्कलमार्गे)
- सिम्पनी सोसायटी समोरून बापुजीबुवा मंदिराकडे व हिंजवडी फेज-तीनकडे जाणारा मार्ग (माणगावाकडून बापूजी बुवा खिंडकडे येणारी वाहतूक चांदे फाटामार्गे व हिंजवडी फेज-३ कडे जाणारी वाहतूक माणगाव मार्गे)
- छत्रपती संभाजी महाराज चौकाकडून शिंदे वस्ती (टाटा टी जंक्शन चौकाकडून शिंदे वस्तीकडे जाणारी वाहतूक लक्ष्मी चौक)
- लक्ष्मी चौकाकडून कासारसाई व मारुंजी गावाकडे जाणारा मार्ग (टाटा टी जंक्शन चौक व फेज-३ मार्गे)
- मेझा-९ चौकाकडून लक्ष्मी चौक (छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे)
- कस्तुरी चौकाकडून विनोदे वस्ती चौक (भूमकर चौकाकडून विनोदे वस्ती कॉर्नरकडे जाणारी वाहतूक इंडियन ऑईल चौक अथवा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे)
- शनी मंदिराकडून भूमकर चौक अंडरपास (इंदिरा कॉलेजकडून भूमकर चौक अंडरपासकडे जाणारी वाहतूक यु-टर्न करून ताथवडे अंडरपास मार्गे)
- एमआयडीसी सर्कलकडून हेलिपॅड सर्कल (एमआयडीसी सर्कल येथून उजवीकडे वळून माणगाव मार्गे)
- परंदवाडी फाटा ते बेबडओहोळ (परंदवाडी फाटा येथून उर्से मार्गे जातील.)
- चापेकर चौकाकडून जुना जकात नाका चिंचवडमार्गे वाल्हेकरवाडी (वाल्हेकरवाडी बिजलीनगरकडे जाणारी वाहतूक जुना जकातनाका- जैन स्कूल- सेव्हन ऑरेंज हॉस्पिटल येथून डावीकडे वळून जाईल)
- चिंचवडेनगर बाजूकडून कोल्हापुरी टी पॉइंट हॉटेल मार्गे वाल्हेकरवाडी (चिंचवडेनगर-बिजलीनगर मार्गे)
-निगडी, भक्ती-शक्ती चौकाकडून त्रिवेणी हॉस्पिटल चौक मार्गे वाल्हेकरवाडीकडे जाणारा मार्ग (चिंतामणी चौक तसेच बिजलीनगर चौक मार्गे)
- चिंचवड, आहेर गार्डन येथून वाल्हेकरवाडी रस्ता (चिंतामणी गणेश मंदिर वाल्हेकरवाडी चौकी)
- गुरुद्वारा चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडीकडे येणारा मार्ग (ए जमाते मस्जिद वाल्हेकरवाडी गुरुद्वारा रोड)
- रावेतकडून रॉयलकासा मार्गे तसेच गुरुद्वारा जिजाऊ चौकाकडून छत्रपती संभाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी (रॉयलकासा मार्गे येणारी वाहतूक शिंदेवस्ती इस्कॉन मंदिर रावेत मार्गे तसेच कुलदेवी मॉड्युलर किचन वाल्हेकरवाडी गुरुद्वारा रोड मार्गे)
- चिंचवड, जुना जकात नाका येथून रिव्हर व्हिव चौक (ही वाहने बिजलीनगर मार्गे जातील.)
- अहिंसा चौकाकडून चापेकर चौक उड्डाणपूल मार्गे रिव्हरव्हिव चौक (चापेकर चौकातून डावीकडे एल्प्रो मॉल रोडमार्गे)
- वाकड वाहतूक विभाग अंतर्गत असलेल्या भूमकर चौक ते डांगे चौक या रोडने डांगे चौक (डिकॅथलॉन ताथवडेगांव चौक ते ताथवडे अंडरपास मार्गे)
- जग्वार शोरूमकडून ते भूमकर चौक (जिंजिर हॉटेल येथून भूमकर चौकाकडे न येता मुंबई-बंगळूर मार्गाने)
- फिनिक्स मॉलकडून काळा खडक सिग्नल (स्कायलाईन रस्त्याने चौधरी पार्कमार्गे)
- काळाखडक मस्जिदकडून जायका टी जंक्शन (डिकॅथलॉन या
ठिकाणावरून मुंबई-बंगळूर मार्गे)
- साठे चौकाकडून जायका टी (जाधव कॉर्नर) (साठे चौकातून दत्त मंदिर रस्त्याने अथवा चौधरी पार्क गल्ली)
- डांगे चौकाकडून भूमकर चौक (डांगे चौकातून सरळ ताथवडे रोड)
- डांगे चौकाकडून चिंचवड (ताथवडेकडून येऊन डांगे चौक उड्डाणपुलावरून काळेवाडी फाटा)
- बारणे कॉर्नरकडून थेरगाव फाट्याकडे (बारणे कॉर्नर येथून डावीकडे पडवळनगर मार्गे तसेच बारणे कॉर्नर येथून उजवीकडे वळून बटरफ्लाय पूलमार्गे)
- राघवेंद्र महाराज मठ येथून बिर्ला चौक (बारणे कॉर्नर थेरगाव किंवा मोरया गोसावी पूल मार्गे)
- हँगिंग पूल मार्गे धर्मराज चौक (हँगिंग पूल उजवीकडे वळून तसेच डावीकडे वळून पुन्हा उजवीकडून धनलक्ष्मी ज्वेलर्स संविधान चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक-रेल्वे लाईन मार्गे)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे अरिहंत डेंटल क्लिनिक (ही वाहने अरिहंत डेंटल क्लिनिककडून पर्यायी मार्गाने जातील)
- आकुर्डी, धर्मराज चौक येथून डी. वाय. पाटील कॉलेजकडे जाणारा मार्ग (आकुर्डी रेल्वे स्टेशन अंडरपास/गुरुद्वारा मार्गे व इस्कॉन मंदिर रस्ता मार्गे)
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com