महिलेची पावणेचार लाखांची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी : ऑनलाइन जॉब आणि हॉटेल रेटिंगचा टास्क देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेची तीन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना ऑनलाइन माध्यमातून हिंजवडी फेज ३ येथे घडली. या प्रकरणी २६ वर्षीय महिला फिर्यादीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीला एका अज्ञात नंबरवरून व्हॉट्सॲपवर ऑनलाइन जॉबबाबत मेसेज आला. फिर्यादीला आलेल्या मेसेजमध्ये तुम्ही जॉब करणार का? असे विचारले असता फिर्यादीने होकार दिला. त्यानंतर त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये ॲड करून हॉटेल रेटिंगचा टास्क दिला. सुरुवातीला काही रक्कम देऊन विश्वास संपादन केल्यानंतर, आरोपींनी फिर्यादीला जास्तीचे पैसे गुंतवण्यास भाग पाडले. तुमचे पैसे ट्रेडिंग ॲपमध्ये अडकले आहेत, ते काढण्यासाठी पुन्हा पैसे भरावे लागतील, असे सांगून फिर्यादीकडून एकूण तीन लाख ७५ हजार रुपये उकळले.
तडीपार गुंडाला पिस्तूलसह अटक
पिंपरी : पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही शहरात आलेल्या गुंडाला चिंचवड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि काडतूस जप्त केले. ही कारवाई चिंचवड रेल्वे स्थानकाजवळ करण्यात आली. अमर नानासाहेब चव्हाण (रा. साठे कॉलनी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केलेले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो शहरात आला. पोलिसांनी त्याच्याकडून ५२ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल बाळगणाऱ्याला सांगवी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पिंपळे सौदागर येथील बस थांब्याजवळील मैदानात करण्यात आली. भैरोबा अमोकसिद्ध दळवी (रा. चिखली, मूळ- सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पिंपळे सौदागर परिसरात सापळा रचून पोलिसांनी दळवी याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विनापरवाना एक पिस्तूल आणि एक काडतूस सापडले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

