दिव्यांग मुलांचा लक्षवेधी सहभाग

दिव्यांग मुलांचा लक्षवेधी सहभाग

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १८ ः ‘सकाळ’ एनआयई चित्रकला स्पर्धेत दिव्यांग मुलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. शारीरिक मर्यादांवर मात करीत त्यांनी करत त्यांनी कल्पकतेतून, रंगसंगतीतून आणि चित्रकलेतील कौशल्यातून निसर्गाच्या सानिध्यात चित्रे रेखाटली.
स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यातील कलागुण प्रदर्शित करण्यासाठी मुले उत्सुक होती. सुटीचा दिवस असतानाही थंडीत मुले आणि पालक सकाळी लवकर उठून स्वेटर घालून केंद्राबाहेर हजर होते. कोणत्या विषयावर चित्र काढायचे, यावर हावभावांतून संवाद करण्यात ते दंग होते. प्रश्नपत्रिका हाती येताच चिमुकल्यांनी पेन्सिलने चित्र रेखाटायला सुरवात केली. बघता बघता ते चित्र काढण्यात दंग झाली. त्यांचे निरनिराळे प्रयोग कागदावर फुलत होते. त्यात कल्पनांचे रंग भरले जात होते. त्यामुळे त्यांची चित्रकृती क्षणाक्षणाला नवे आनंददायी रंग धारण करत होती. पालकही कुतूहलाने चिमुकल्यांकडे पाहत होते.
---------
मला चित्र काढायला खूप आवडतात. मी सकाळ चित्रकला स्पर्धेत नेहमीच सहभाग घेत असते. मला ही स्पर्धा खूप आवडते.
- जोहा खान, विद्यार्थिंनी
---
‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा खूप छान वाटली. स्पर्धेचे नियोजन सुद्धा छान होते. वर्गात न बसता मस्त निसर्गाच्या सानिध्यात रमून चित्र काढले व रंगवले. मला या स्पर्धेत दरवर्षी बक्षिसे मिळतात. म्हणून मी नेहमी आनंदाने ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेत सहभागी होतो.
- श्रेयस उबाळे, विद्यार्थी
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com